Home | Jeevan Mantra | Dharm | great indian teachers

हे आहेत भारतीय इतिहासातील युगनायक शिक्षक

धर्म डेस्क | Update - Sep 05, 2011, 02:44 PM IST

या लेखात आपण युगनायक घडविणा-या महान शिक्षकांची ओळख करून घेऊ या.

 • great indian teachers

  भारताच्या इतिहासात हजारो वर्षांपासून अनेक युगनायक शिक्षक होऊन गेल्याचे दिसते. श्रीरामापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले त्या प्रत्येक महापुरुषामागे एक खंबीर शिक्षक किंवा गुरूचे आशीर्वाद होते. या लेखात आपण युगनायक घडविणा-या महान शिक्षकांची ओळख करून घेऊ या.
  सांदिपनी.आचार्य सांदिपनी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरू होते. त्यांचा आश्रम उज्जयिनी अर्थात आजच्या उज्जैन येथे होता. सांदिपनी ऋषींनी श्रीकृष्णाला या आश्रमात 64 कलांचे शिक्षण दिले. भगवान विष्णूचे पूर्णावतार श्रीकृष्ण यांनी सर्वज्ञानी झाल्यानंतरही सांदिपनी ऋषींकडून मार्गदर्शन घेतल्याची नोंद आहे. माणूस कितीही ज्ञानी झाला तरी त्याला गुरूची आवश्यकता असते, हे यावरून ध्यानी येते. सांदिपनी ऋषी हे परम तपस्वी होते. त्यांनी भगवान शिवाची तपश्चर्या करून उज्जैन परिसरात कधीही दुष्काळ पडणार नाही, असे वरदान मिळविले होते.
  वशिष्ठ. त्रेतायुगात भगवान श्रीरामाचे गुरू होते. भारतीय गुरूंमध्ये वशिष्ठांचे स्थान मोठे आहे. श्रीरामामधील प्रतिभा आणि रामाचा सदव्यवहार सर्वप्रथम वशिष्ठ ऋषींनीच जाणले होते. वेद आणि वेदांगाचे शिक्षण वशिष्ठ ऋषींनीच श्रीरामाला दिले होते. श्रीरामाच्या जडणघडणीत वशिष्ठ ऋषींचे योगदान मोलाचे आहे.
  विश्वामित्र.भगवान श्रीरामाला परम योद्धा बनविण्याचे श्रेय विश्वामित्रांना आहे. एक क्षत्रिय राजा असलेले विश्वामित्र ऋषी बनतात. ते भृगु ऋषीचे वंशज होते. भगवान रामाजवळ असलेले सर्व दिव्यास्त्र विश्वामित्रांनी दिलेले होते. त्या काळातील सर्वोच्च अस्त्रनिर्माता म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी ब्रह्माच्या समकक्ष आणखी एका सृष्टीची निर्मिती केली होती.
  द्रोणाचार्य. द्वापार युगात कौरव आणि पांडवांचे गुरू होते. शिक्षकांच्या पंक्तीत यांचे नाव आदराने घेतले जाते. द्रोणाचार्य यांनी अर्जुनासारखे श्रेष्ठ धनुर्धर घडविले. द्रोणाचार्य हे द्वापार युगातील एक श्रेष्ठ शिक्षक होते.
  चाणक्य. आचार्य विष्णूगुप्त आणि कौटिल्य या नावानेही चाणक्य विख्यात आहेत. कलियुगातील पहिले युगनायक म्हणून त्यांना मान्यता आहे. कूटनिती शास्त्रातील तज्ञ असलेल्या कौटिल्याने चंद्रगुप्त मौर्यसारख्या सामान्य भारतीय युवकाला परकीय आक्रांता सिकंदर आणि अन्यायी धनानंद यांच्या विरोधात उभे करून विजयी केले. चंद्रगुप्त मौर्य याला अखंड भारतचे सम्राट बनविले. छोट्या छोट्या जनपदांमध्ये विखूरलेल्या भारताला सर्वप्रथम एका सूत्रात बांधण्याचे महान कार्य चाणक्य यांनी केले. चाणक्य हे एक अर्थतज्ञ होते. परंतु देशाची गरज ओळखून त्यांनी राजकीय रणनीती आखली आणि यशस्वी केली.
  रामकृष्ण परमहंस.स्वामी विवेकानंदांचे गुरू आचार्य रामकृष्ण परमहंस हे भक्तांच्या श्रेणीत श्रेष्ठ मानले जातात. माता कालीचे ते भक्त होते. कालीची पूजा करताना ते भान हरपून जात. समाधि अवस्थेत जात. यावेळी ते माता कालीशी संवाद करीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानग्रहण केलेल्या स्वामी विवेकानंदांनी जगात हिंदू धर्माची विजयपताका फडकविली.  शिक्षक दिन विशेष - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तीन प्रश्नTrending