आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात गुरुमंत्र का आवश्यक आहे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनात गुरुमंत्र खूप महत्त्वाचा असतो. जीवनाची वाटचाल व यशप्राप्तीमध्ये तो वेळोवेळी उपयोगी पडत असतो. जीवनात गुरू जेव्हा मंत्र देत असतो तेव्हा मोठा शक्तिपात होत असतो. हा शक्तिपात आपल्याला सद्गुण जीवनामध्ये उतरवण्यामध्ये मदत करत असतो. आपण मंत्र आणि शक्तिपाताची संकल्पनाही समजून घेणे आवश्यक आहे.
शक्तिपात झाल्यानंतर जागृती, सर्मपण, पुरुषार्थ व कर्तव्याची जाण होते. आंतरिक तसेच बाह्य शक्तीचे अवलोकन हे साधनेमध्ये होत असते. भाव, संस्कार, वृत्ती तसेच वासना आदींना क्रियांमध्ये शक्तिपात क्षीण करतो. त्यानंतर शक्तिपाताचे दिव्य स्वरूप प्रकट होते. त्यासाठी भक्ताला उत्साहाने व सर्मपणपूर्वक साधना करणे आवश्यक असते. शक्तिपात साधनप्रणालीमध्ये गुरूचे स्थान महत्त्वाचे असते. गुरू केवळ मार्गदर्शन नसतो तर तो अपितु स्वयं ज्ञातव्यदेखील असतो. भक्त गुरूमध्ये केवळ ईश्वरच पाहत नसतो तर ईश्वराची अनुभूतीदेखील करत असतो. ईश्वरच गुरूशरीरात दयाळूपणे क्रियाशील होऊन भक्तावर आपली कृपादृष्टी टाकत असतात आणि आंतरिक मार्ग खुला करत असतात. शिष्याला भक्तीच्या क्रियाशीलतेचा प्रत्यक्ष अनुभव करून देऊन, कर्त्यामध्ये मिथ्याभाव नाहिसा करून दृष्टभाव प्राप्त करून देतात. ज्याप्रमाणे भक्ताची भक्तीवर श्रद्धा असते त्याचप्रमाणे त्याची गुरूवरदेखील श्रद्धा असणे आवश्यक असते. श्रद्धेमुळेच आत्मज्ञान प्राप्त होते.