आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस गळण्याची ही दहा कारणे नाहीत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केस गळण्याबाबत लोकांचा ब-याच काळापासून गैरसमज आहे. जाणते-अजाणतेपणी लोक या गैरसमजांनाच केस गळण्याचे कारण मानतात. वास्तविक या बाबींचा केस गळण्याशी संबंध नसतो. अशाच दहा गैरसमजांबाबत जाणून घेऊया ...
1 केस पुन्हा पुन्हा कापण्याने लांबसडक व पक्के होतात ! हा चुकीचा समज आहे. लोक डोक्यावरच्या केसांची तुलना दाढीच्या केसांशी करतात. छोटे असताना कापल्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होणार नाही. महिनाभरात केस एक सेंटिमीटर वाढतात.
2 एक पांढरा केस उपटल्यास
दोन केस उगवतील! हा समजही खोटा आहे. असे झाले असते तर
डोक्यावर टक्कल पडलेल्या लोकांनी डोक्यावरचे उरलेसुरले केसही उपटून
टाकले असते व हेअर ट्रान्सप्लांट उपचारांची गरज भासली नसती.
3 शीर्षासन केल्याने डोक्याच्या त्वचेकडे रक्तप्रवाह वाढतो व केस गळणे थांबते! हासुद्धा गैरसमज आहे. डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो, पण त्याचा केसांना काडीचाही फायदा होत नाही. केस गळण्याचे कारण गुणसूत्रात दडलेले असते.
4 टॉवेलने खसाखसा डोके पुसल्याने केस गळतात! हा समजही चुकीचा आहे. असे केल्याने ज्या केसांची मुळे अत्यंत कमकुवत आहेत तेच केस गळतील. हे केस इतर कोणत्याही कारणाने गळाले असते. टॉवेल फक्त केस कोरडे करतो.
5 दररोज केस गळाल्यास पुरुषांप्रमाणे टक्कल पडण्याचा धोका! हासुद्धा गैरसमज आहे. साधारणत: एका माणसाचे दररोज 100 केस गळतात व नवे 100 केस उगवतात. केस गळणे सामान्य बाब आहे. नवीन केस उगवणे थांबेल तेव्हाच टक्कल पडण्याचा धोका आहे.
6 केस गळणे हा आईकडून मिळालेला वारसा! हासुद्धा गैरसमज आहे. टक्कल पडण्यास आॅटोसोमल नावाची गुणसूत्रे जबाबदार आहेत. यामध्ये पुरुष किंवा स्त्री असा फरक नसतो. म्हणजेच केस गळणे हा वारसा आई किंवा वडिलांकडूनही मिळू शकतो.
7 टोपी घातल्याने केस गळतात! टोपी घातल्यामुळे केसांना हवा मिळत नाही. त्यामुळे केस गळतात असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. वास्तविक टोपी घातल्याने टक्कल पडत नाही, तर लपते.
8 केस गळणे म्हणजे टक्कल पडणे नाही! केस गळत असल्यास लोकांना टक्कल पडण्याची भीती असते. मात्र, असे होत नाही. टक्कल पडण्याच्या क्रियेत केस पातळ होत जातात. त्याला मिनिएचरायझेशन म्हटले जाते.
9 वारंवार कंगवा फिरवल्याने केसांचे नुकसान होते! हा समज चुकीचा आहे. केसांचा गुंता सोडवताना काही केस तुटतात, पण नवीन केस उगवतात. केसातून कंगवा फिरवल्याने केसांच्या मुळांचे काहीही नुकसान होत नाही.
10 वारंवार शाम्पू केल्याने केस गळतात! पातळ व रुक्ष
केसांसाठी आपण नेहमीच शाम्पूला दोषी ठरवतो. त्यामुळे आपण वारंवार शाम्पू बदलतो. परंतु शाम्पूचा केस गळण्याशी काहीही संबंध नाही.