शाश्वत आनंदासाठी घरात आध्यत्मिक भाव जोपासा
एक काळ असा होता की लोक अधिक वेळ घरातच घालवत असत.
-
एक काळ असा होता की लोक अधिक वेळ घरातच घालवत असत. कार्यालयात आणि व्यवसायात कमी वेळ देत असत. जितका वेळ आपल्या कामाला तितकाच वेळ आपल्या परिवाराला देण्याचा काळ आला. नंतर अधिक वेळ नोकरी-व्यवसायात जाऊ लागला आणि राहिलेला वेळ घरात देण्यात येऊ लागला. आता आगामी काळात घरातच कार्यालय थाटावे लागेल. एकूणच वेळेची कपात ही घरच्या लोकांच्या वेळेतूनच होत आहे. जो काही थोडाफार वेळ घरच्यांसाठी असतो, तो मतभेद आणि वादविवादात जात आहे. या कारणांमुळेही लोकांची घरांविषयीचे आकर्षण कमी होत चालले आहे. अशा वेळी विचारी लोकांना घरात आध्यात्मिक आकर्षण हवे असते.
देवाला जोडण्याचा एक अर्थ म्हणजे देवांनी जे अवतार घेतले आहेत आणि त्यांच्यामार्फत जो संदेश देण्यात आला आहे, त्याला जनमानसात पोहोचवणे होय. यामुळे भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल. कामात इमानदारी येईल आणि असे लोक जेव्हा परिवाराकडे येतील तेव्हा ते थोडा आराम करू शकतील. कामकाजाच्या आंधळ्या जगात धावपळ करणारे लोक आपल्या परिवारावर प्रेम करतील तर त्याचा चांगला परिणाम होईल.