आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे 365 शिवमुद्रा असलेले महादेवाचे मंदिर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा शिवमंदिर संस्कृतीच्या आध्यात्मिक सेतूने जोडल्या गेल्या आहेत. यामुळे लोकपरंपरेच्या सामाजिक ऐक्याचा एकोपा शिवालयातील शिवलिंग दर्शनाने जमलेल्या भाविकांमध्ये पाहावयास मिळतो. भाषेची भिन्नता असली तरीही श्रद्धास्थान मात्र एकच असतात याची अनुभूती कुडल संगम गावातील हरिहरेश्वर मंदिरातून होते.
सोलापूरपासून 30 किलोमीटरवर भीमा व सीना नदीवरील संगमालगत असलेल्या या मंदिरातील शिवलिंगाला 365 शिवमुद्रा आहेत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत व सोलापूरपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर दोन राज्यांच्या भीमा, सीना नदी संगमतीरावर कुडल संगम गावाच्या सीमेलगत 1996 मध्ये झालेल्या उत्खननात हे शिवलिंग मिळाले. हरिहरेश्वर या शिवमंदिराच्या भूकुशीतून सापडलेले शिवलिंग चार मीटर परिघाचे व मध्यभागी 117 मीटर उंच असे अद्भुत आहे. या शिवलिंगावर नऊ ओळींमधून उठून दिसणार्‍या 365 शिवमुद्रा कोरलेल्या आहेत. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास 365 संख्या म्हणजे एक वर्षाचा कालावधी.
असे शिवलिंग इतर कुठेही असल्याचा उल्लेख आढळून येत नाही. या मंदिराची रचना, मुखमंडप, सभामंडप, दगडी प्रवेशद्वार, प्राचीन काळातील दिव्य शिववैभव संपन्नतेची साक्ष देते. हरिहर अर्थात शिवलिंग आणि कृष्णमूर्ती यांचे एकत्रित अस्तित्व शिवलिंगावर दिसून येत असल्याने याला हरिहरेश्वर असे संबोधले जाते.