आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Havey Caffeine To Side Effect Of Human Body Control

कॅफिनच्या परिणामावर नियंत्रण कसे ठेवाल?

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाचा ताण किंवा तणावाच्या स्थितीत गरजेपेक्षा जास्त कॉफीचे सेवन करण्याची अनेकांना सवय असते. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत शरीरात कॅफिनची पातळी वाढते. ही पातळी डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. जाणून घेऊया अशा स्थितीत कोणत्या उपायांच्या मदतीने कॅफिनच्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.
>अशा स्थितीत होणार्‍या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी वामकुक्षी घ्यावी. जर तुम्ही कार्यालयात असाल तर थोड्या वेळासाठी हेडडाउन म्हणजे मान खाली घालून बसावे.
>यादरम्यान पीडित वेदनाशामक औषधांचे सेवनही करू शकतो. मात्र, कोणत्याही वेदनाशामक औषधांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
>भरपूर पाणी प्यावे. जास्त कॉफी पिल्याने शरीरात झालेल्या अधिक कॅफिनपासून सुटका करून घेण्यासाठी हीच पद्धत फायदेशीर ठरू शकते.
>पेपरमिंट टीचे (पुदिन्यापासून तयार झालेला आयुर्वेदिक चहा) सेवन करणेही फायदेशीर ठरते. जास्त कॅफिनच्या सेवनामुळे होणार्‍या डोकेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठीही याचा फायदा होतो. हा एक नैसर्गिक उपाय आहे. यामुळे मानसिकरीत्याही आराम मिळतो.
>मसाज थेरपीसुद्धा पीडितासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे वेदनेतून सुटका होण्यासोबतच पीडित रिलॅक्सही होतो. या थेरपीमध्ये वापरण्यात येणार्‍या नैसर्गिक अर्क किंवा तेलांमुळे पीडितास आराम मिळतो.