आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यायाम, आरोग्यप्राप्ती, संतती आणि पोषणात संतुलन राखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली दिनचर्या आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करून फिट राहता येऊ शकते. फिट राहण्याचे दहा सोपे उपाय जाणून घ्या.
* हे खावे किंवा खाऊ नये. हे कधीच खाऊ नये किंवा नेहमी खावे. असे खाणे नेहमी टाळावे. हे खाण्यास सुरुवात करावी. असे खाणे बंदच करावे. या सर्वांपेक्षा काहीतरी खावे हे महत्त्वाचे आहे. कधीही उपाशी राहू नका.
* अँटिऑक्सिडंट्ससारख्या व्हिटॅमिन सी आणि ईचे सेवन करावे. मल्टि-व्हिटॅमिनचे सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता.
* सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान पंधरा-वीस मिनिटे उन्हात उभे राहा किंवा फिरून या. यामुळे शरीरात डी व्हिटॅमिन तयार होते.
* तंतुमय पदार्थांमध्ये बिया असतात. त्यांच्या सेवनामुळे आजारांचा धोका कमी होतो.
* चरबी कमी करण्यासाठी व्यायाम, आरोग्यप्राप्ती, संतती आणि पोषण या तीन गोष्टींवर लक्ष द्या.
* सडपातळ, स्थूल असो की तरुण किंवा वृद्ध, नियमितपणे कार्डिओ एक्सरसाइज करा. वजन उचलण्याचा व्यायाम तसेच कार्डिओ सेशनमध्ये काही वेळ विश्रांती घ्या.
* व्यायामाआधी स्वत:ला वॉर्म-अप आणि नंतर कूल-डाउन करा.
* आहारातून पांढरे पदार्थ म्हणजे पांढरी साखर, पांढरा भात, पांढरे पीठ वर्ज्य करा. पांढ-या रंगाचे पदार्थ शरीरासाठी धोकादायक असतात.
* फिटनेससाठी दीर्घकालीन ध्येयनिश्चिती करा आणि ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करा.
* रेनबो डाएट प्लॅनचचा आधार घ्या. या डाएटमध्येही विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते.
प्रशांत तळवलकर
prashant.talwalkar@dainikbhaskargroup.com