आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा हाच खरा धर्म आणि कर्म आहे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुलाधारा हे एक उदार विचारांचे विद्वान होते. त्यांना देखावा करण्यात रस नव्हता. ते कधी धार्मिक यात्रेवर गेले नाहीत. नित्याने मंदिरात जाणे, पूजापाठ करणे, व्रत - उपवास करणे त्यांच्या दिनचर्येत नव्हते. ते प्राणिमात्रांची सेवा करणे सर्वोपरी मानत असत आणि त्यातच ते मग्न राहत असत. एके दिवशी तुलाधाराच्या घरी साधू आला. तुलाधारांनी त्याचा यथोचित सत्कार केला. दोघांमध्ये धार्मिक चर्चा सुरू झाली. साधू तुलाधारावर फार प्रभावित झाला आणि म्हणाला, बेटा, तू काही दिवसांसाठी तीर्थयात्रेवर जा. त्यातून तुला शांती आणि पुण्य लाभेल. साधूचे ऐकून तुलाधाराने स्मितहास्य केले आणि म्हणाले, महाराज, माझ्या या गावात कित्येक लोक भुकेने व्याकुळ आहेत. कित्येकांना औषधाची आवश्यकता आहे आणि कित्येकांना वस्त्रांची गरज आहे. मी आपल्या कमाईचे चार पैसे त्यांची भाकर, कापड आणि औषधावर खर्च करू इच्छित आहे. हीच माझी तीर्थयात्रा आहे आणि त्यातूनच मला परम शांती लाभते. यालाच मी खरे पुण्य मानतो. तुलाधाराचे हे ऐकून साधूला आपल्या आस्तिकतेची जाणीव झाली आणि तो तुलाधाराला गुरू मानून सेवा करू लागला.
तात्पर्य
- सेवा हाच खरा धर्म आणि कर्म आहे. कारण त्यातूनच खरे समाधान मिळत असते.