Home »Jeevan Mantra »Junior Jeevan Mantra» Home Dream To Watch

स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्‍यासाठी हे करून पाहा

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 23, 2012, 14:31 PM IST

  • स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्‍यासाठी हे करून पाहा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुख समाधानाने राहावे. पण या जगात असे कितीतरी लोक आहेत, जे हे स्वप्न पाहात उठतात आणि झोपी जातात. त्यांचे हे स्वप्न अपूर्णच रहाते. जर तुम्हाला वाटत असेल की, आपले पण एक घर असावे तर चंद्रग्रहणामध्ये खाली सांगितलेले हे उपाय अवश्य करा.
ग्रहण सुरु होण्याआधी आंघोळ करून स्वच्छ पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर लोकारीचे आसन घेऊन उतरेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर एक ताट ठेवावे. त्यानंतर एक पत्राळ घेऊन त्यावर केशराने आपल्या स्वतःचे घर असावे, या शब्दांत आपली मनोकामना त्यावर लिहावी. त्यानंतर 108 माळी खाली सांगितलेल्या मंत्राचा जप करावा.
ऊँ देवोत्थाय नमः
आता एक मोतीशंख घ्या. तो पत्राळीत गुंडाळून घरापासून लांब असलेल्या वडाच्या झाडाखाली ठेऊन द्या. देवाच्या मनात असेल, तर लवकरात लवकर आपली मनोकामना पूर्ण होईल.

Next Article

Recommended