Home | Jeevan Mantra | Dharm | how mankind will be safe

या पृथ्वीतलावर मानवी जात टिकायची असेल तर...

दिव्य मराठी | Update - Jul 15, 2011, 06:11 PM IST

आज जगासमोरचा कळीचा प्रश्न आहे यातल्या कोणत्या तत्त्वाचा अंगिकार करावा?

  • how mankind will be safe

    जग एक कुटुंब ही भावना आणि जग ही एक बाजारपेठ ही भावना, या दोन भावना परस्परांपासून भिन्न आहेत. या भावना परस्पर विसंगतही आहेत. घरातले व्यवहार प्रेमावर आधारलेले असतात, तर बाजारातले व्यवहार स्पर्धा आणि कपट यावर आधारलेले असतात. घरात समविचारीपणा नांदत असतो, तर बाजारात परस्पर विरोधी हितसंबंधांचा टकराव होत असतो. घराचे अंतिम उद्दिष्ट शांती हे असते, तर बाजाराचे अंतिम उद्दिष्ट नफा हे असते.
    बाजार जडवादी तत्त्वांवर चालतो, तर घर आध्यात्मिक मूल्यांवर चालते. परस्पर सहकार्य हा कुटुंबाचा पाया असतो, तर शोषण हा बाजाराचा मान्यता प्राप्त मार्ग असतो. बाजारात बिभत्स उपभोक्तावाद वाढवला जातो, तर घरात मूल्याधारित, काटकसरीचे संस्कार केले जातात.
    आज जगासमोरचा कळीचा प्रश्न आहे यातल्या कोणत्या तत्त्वाचा अंगिकार करावा? कोणती जीवनप्रणाली आत्मसात करावी ? कोणता दृष्टिकोन अंगिकारावा ? पाश्चात्य विचाराचा प्रयोग करून झाला आहे. त्याच्या साह्याने संपन्न आणि समाधानी जीवन जगता येत नाही. मानव जातीला आता योग्य मार्गाची निवड करायची आहे. आता काही पाश्चात्य विचारवंतही या निष्कर्षाप्रत आले आहेत की, या पृथ्वीतलावर मानवी जात टिकायची असेल आणि तिला समाधानी जीवन जगायचे असेल, तर पौर्वात्य विचारांशिवाय पर्याय नाही. जगासमोर दोन पर्याय आहेत. एक आहे मानवधर्म आणि दुसरा आहे "बाजार'. एक पर्याय आहे विश्व कुटुंबाचा तर दुसरा विश्वव्यापाराचा. याबाबत स्वामी विवेकानंद यांनी 100 वर्षांपूर्वीच म्हणून ठेवले आहे, "सारे पाश्चात्य जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. या ज्वालामुखीचा येत्या 50 वर्षांत स्फोट होणार आहे. उपनिषदांतला विचारच त्यांना या स्फोटापासून वाचवणार आहे.'' स्वामीजींचा हा विचार कोणी विचारात घेतला नाही आणि त्यामुळे छोट्या-मोठ्या ज्वालामुखींचे स्फोट हा आता नित्यक्रम झाला आहे.

    follow us on twitter@ Divyamarathiweb

Trending