आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे राहा ‘फिट अँड फाइन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला तंदुरुस्त राहावेसे वाटते. मात्र आहारनियमन किंवा व्यायामाचे नाव काढताच सर्वांचा उत्साह मावळतो. मात्र काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ व्यायाम करणेच आवश्यक नाही, तर योग्य आहार आणि थोडासा व्यायाम केला तरी पुरेसे ठरते. जाणून घेऊया त्याबाबत अधिक.
1. लो कॅलरी अर्थात कमी उष्मांकाच्या मसाल्यांचा वापर करा. मेयोनीजऐवजी मोहरीचा वापर केला जाऊ शकतो.
2. खाण्याचे वहीखाते मेंटेन करा. दिवसभर जे खाल, त्याची नोंद करा. त्यावरून तुम्ही किती अतिरिक्त उष्मांक ग्रहण केलेत ते समजे
3. जर तुम्ही बाहेर जेवण करत असाल तर फस्र्ट कोर्स मीलमध्ये सॅलड व सूप जरूर घ्या. त्यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्ही जास्त उष्मांकाचा आहार घेणार नाहीत.
4. बाहेर जेवण केल्यानंतर जर तुम्हाला गोड खाण्याचा मोह आवरत नसेल तर त्यात कुणाला तरी वाटेकरी बनवा.
5. तुम्ही आहारनियमन करत असाल तर आठवड्यात एखाद्यावेळी स्वत:ला मेजवानी देऊ शकता. अधूनमधून ब्रेक घेतल्यास आहारनियमन योग्य पद्धतीने करता येते.
6. नियमित आहारनियमनासह व्यायाम करणेही अत्यावश्यक आहे. दिवसातून 20-25 मिनिटे सोपा व्यायाम केल्यास फायदेशीर ठरेल. आहारनियमनाबरोबरच व्यायाम केल्यास वजन घटवणे सोपे जाते.
7. आपल्या व्यायामाचे वेळापत्रक आपल्या जोडीदारासह पाळायला हवे. त्यामुळे तुमचा व्यायाम मजेदार होईल तसेच दोघांना सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
8. तुमच्या व्यायामात वेट ट्रेनिंगसोबतच कार्डियोव्हॅस्क्युलर व्यायामाचाही समावेश असायला हवा. त्यामुळे मेद घटवायला मदत होईल.
9. जर दररोज व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून कमीत कमी चार-पाच वेळा नक्की व्यायाम करायला हवा.