Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | how to celebrate birthday

वाढदिवस साजरा करताना काय करावे आणि काय करू नये, हे समजून घ्या

धर्म डेस्क | Update - Jul 24, 2011, 05:15 PM IST

वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो.

  • how to celebrate birthday

    वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत. काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात. वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे असा विचार साधारणपणे करण्यात येतो, परंतु असा विचार करून आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
    आपल्या धर्मशास्त्रांनी काही मूलभूत गोष्टी सांगीतल्या आहेत. शास्त्रांनी सांगीतलेल्या गोष्टी समजून न घेतल्यांने अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. सगळे करतात म्हणून आपणही चुकीच्या गोष्टी करणे हे खरे तर आपल्या कमकुवत मनाचेच लक्षण आहे. मात्र आपण त्याला प्रतिष्ठेचा मुलामा देऊन स्वताचे समाधान करून घेत असतो. येथे आपण जाणून घेऊ की वाढदिवशी काय करावे आणि काय करू नये.
    वाढदिवशी नख, केस कापणे टाळावे. वाहनाने प्रवास करू नये. भांडण, हिंसा, अभक्ष्यभक्षण अर्थात मांस, अपेयपान अर्थात मद्य, दारू आणि स्त्रीसंपर्क यापासून कटाक्षाने दूर रहावे. दिवा विझवणे ही बाब मृत्यूशी निगडीत आहे. त्यामुळे मेणबत्ती पेटवून विझविणे वगैरे प्रकार करू नये. हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरूवात मध्यरात्री नव्हे तर सूर्योदयाने होत असते. यावेळी वातावरणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयानंतर दिले गेलेल्या शुभेच्छा या अधिक फलदायी असतात. त्यामुळे मध्यरात्री शुभेच्छा देण्याचा मोह टाळावा.
    वाढदिवशी ग्रामदैवताचे दर्शन करावे. मातापित्यांचा आणि वडिलधा-यांचा आशीर्वाद घ्यावा.

Trending