Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» How To Safe From Sun Light

उन्हामुळे चेहरा काळवंडण्यापासून थांबवण्याचा फंडा

डिबी स्टार | Jun 01, 2012, 08:19 AM IST

  • उन्हामुळे चेहरा काळवंडण्यापासून थांबवण्याचा फंडा

तरुणाई चेहर्‍याला खूप जपते. त्यामुळे अनेकजण प्रखर उन्हात जाणे टाळतात; पण प्रत्येकवेळी बाहेर पडणे टाळणे शक्य नसते. डॉक्टरांच्या, सौंदर्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार काही घरगुती उपचार करून किंवा बाजारातील काही फेशियल्स वापरून आपण या समस्येला ‘बाय-बाय’ करू शकतो. उन्हातून आल्यानंतर फेसवॉशने चेहरा धुवून डॉक्टरांनी सुचवलेले एखादे क्रीम लावावे. त्याचबरोबर चेहर्‍यावरील तेज कायम ठेवण्यासाठी फळांचे ज्यूस, ताक पिणे, पालेभाज्यांचे सेवन करणेही तेवढेच आवश्यक आहे.

त्वचेचे मुख्य प्रकार - कोरडी (ड्राय), तेलकट (ऑयली), सामान्य (नॉर्मल) असे त्वचेचे मुख्य तीन प्रकार आहेत. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांचा चेहरा ऊन आणि कोरडी हवा यामुळे अधिक काळवंडतो. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याला प्राधान्य देतात. असे फेशियल्स करण्यात काहीच वावगे नाही. मात्र, त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर अधिक चांगले, कारण सर्वच फेशियल्स फायद्याचे ठरतात असे नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो.

फेशियल्ससंबंधी सल्ला घ्या - वयानुसार फेशियल्स करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. गोल्ड, पॅल्टेनियम, फूट फेशियल्स आदींपैकी आपल्या चेहर्‍यासाठी काय उपयुक्त आहे हे डॉक्टरांकडून जाणून घ्यावे. फेशियल्स केल्यामुळे चेहर्‍यावरील टॅनिन निघून जाते, पर्यायी चेहर्‍यावर पुटकळ्या येत नाहीत.

साधे पण रामबाण उपाय - उन्हात घराबाहेर पडताना नेहमी स्कार्प, रुमाल वापरावा. भरपूर जेवन आणि पाणी प्यावे. फळाहार घ्यावा. त्याचबरोबर चण्याच्या डाळीचे पीठ, दुधावरील साय, पपईसारख्या फळांचा गर चेहर्‍याला लावावा. यामुळे चेहर्‍याचा तेज टिकून राहण्यास मदत होते.
काय म्हणतात सौंदर्यतज्ज्ञ
घरगुती उपयांनी चेहरा तेजोमय - फेशियल्सपेक्षा डॉक्टरांच्या मार्गदर्शमानुसार आपल्या चेहर्‍याला कोणत्या पोषकतत्त्वाची आवश्यकता आहे हे प्रथम जाणून घ्यावे. त्याप्रमाणे घरगुती उपायांनी चेहरा तेजोमय बनवावा. यासाठी हळद, केसांसाठी तेल, शिकेकाई वापरावी. कोरफडीचा गर व नारळाचा गर चेहर्‍याला लावावा, अशा उपायांमुळे चेहरा तजेलदार दिसतो. डॉ. उदय कुलकर्णी, त्वचारोग तज्ज्ञ
ब्यूटी पार्लरमध्ये जावे
अलीकडे ठिकठिकाणी पार्लरची सुविधा आहे. त्यामुळे घरीच काही उत्पादने आणून चेहर्‍यावर प्रयोग करणे महागात पडू शकते. योग्य तपासणी करून ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन अशी फेशियल्स करून घ्यावीत, कारण नुसते पार्लर महत्त्वाचे नाही, तर पॉर्लरमध्ये आपल्याला काय उपचार दिले जातात हे महत्त्वाचे असते. शेवटी चेहरा आपली ओळख सांगणारा असतो, तो विद्रूप होता कामा नये. मुग्धा जोशी,सौंदर्यतज्ज्ञ
Next Article

Recommended