जर दुकानातील विक्री / जर दुकानातील विक्री कमी झाली असेल तर हा उपाय करा

Aug 18,2011 02:54:14 PM IST

बऱ्याच वेळेस दुकानातील विक्री अचानक कमी होते. त्याचे अनेक कारणे असू शकतात. कोणीतरी तुमच्या दुकानांवर करणी केली असेल किंवा तुमच्या दुकानाला कोणाचीतरी नजर लागली असेल. अशावेळेस घाबरण्याचे काही कारण नाही कारण काही सोपे उपाय केले केले तर या समस्या दूर होतील.
उपाय -
घरातून दुकानात जाताना दही, पेढा किंवा काहीतरी गोड खाऊन घराबाहेर पडा.
जर रस्त्यात तृतीयपंथी भेटले तर त्यांना पैसे किंवा कपडे द्या असेच त्यांना खुश करून त्यांच्याकडून एक रुपया घ्या. तो रुपया आपल्या दुकानातील गल्ल्यात ठेवा. तुमच्या दुकानातील विक्री वाढेल.
पाच मंगळवारी नियमित बत्ताशे वाहत्या पाण्यात प्रवाहित करा ही क्रिया सूर्योदयाच्या वेळी करा.
शुक्ल पक्षातील शनिवारी घरातून निघाल्यानंतर पिंपळाच्या झाडाचे एक पान घ्या व ते दुकानात ठेऊन त्याला धूपदीप दाखवून आपल्या गादीखाली ठेवा. असे नियमित सात शनिवारी करा. शेवटच्या शनिवारी सातही पाने एका पिशवीत भरून तलाव किंवा विहिरीत प्रवाहित करा.X