देवाला प्रदक्षिणा घालताना / देवाला प्रदक्षिणा घालताना या गोष्टींकडे लक्ष द्यावे कारण की

धर्मडेस्क. उज्जैन

Aug 17,2011 12:49:15 PM IST

देवाची पूजा अर्चना केल्यानंतर त्या परिसरात सकारात्मक उर्जा निर्माण होते, त्या उर्जेला ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते. सर्व देवी देवतांची प्रदक्षिणा घालण्याची वेगवेगळी संख्या आहे.
महादेवाला आर्धी प्रदक्षिणा घातली जाते.
देवीच्या मूर्तीला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात
विष्णू तसेच विष्णूच्या सर्व अवतारीत देवांना चार प्रदक्षिणा घातल्या जातात.
गणपती व हनुमानाला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात
प्रदक्षिणा नियम
प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर मध्येच थांबू नये. प्रदक्षिणा जेथून सुरु केली तेथेच समाप्त करावी. प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. प्रदक्षिणा घालताना बोलू नये. ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवाचे स्मरण करावे.

X
COMMENT