मंदिरात गेल्यानंतर चरणामृत / मंदिरात गेल्यानंतर चरणामृत अवश्य घ्या कारण...

Aug 12,2011 09:50:11 PM IST

मंदिरात गेल्याने मनाला शांती मिळते. असं म्हणतात की, मंदिरात कधीच रिकाम्या हाताने जाऊ नये आणि चरणामृत घेतल्याशिवाय मंदिरातून परतू नये. मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वी काही क्षण मंदिरात बसले पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपल्याला माहितीच्या असतात. परंतु या परंपरांच्या मागेही काही वैज्ञानिक विचार केलेला असतो, हे आपल्याला माहित नसते. भगवंताच्या चरणाचे पाणी किंवा जल अर्थात चरणामृत. चरणामृताचे खूप महत्त्व आहे.
शास्त्रात म्हटले आहे की,
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्।
विष्णो: पादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ।।
भगवान विष्णुंच्या चरणाचे अमृतरूपी जल समस्त पाप व्याधिंचे शमन करणारे आहे. औषधासारखे आहे भगवंताच्या चरणाचे अमृत. हिंदू धर्मात चरणामृताला अतिशय पवित्र मानले गेले आहे. चरणामृत मस्तकाला लावून प्राशन करतात. भगवान श्रीरामाचे चरण धुवून ते चरणामृताच्या रूपात स्वीकारून केवट याने स्वत:ची भव बाधेतून सुटका करून घेतली. आपल्या पूर्वजांचेही कल्याण केले. चरणामृताला केवळ धार्मिक दृष्टीनेच महत्त्व आहे असे नाही. चिकित्सेच्या दृष्टीनेही चरणामृताचे महत्त्व आहे. चरणामृत तांब्याच्या पात्रा ठेवले जाते. त्यात तुळसीची पाने टाकतात. तांब्याच्या पात्रातील पाणी औषधी असते. तुळसदेखील औषधी वनस्पती आहे. त्यामुळे चरणामृतात अनेक रोग नष्ट करण्याची शक्ती आहे.

X