यश पाहिजे असेल / यश पाहिजे असेल तर स्वत:बद्दल श्रद्धाभाव बाळगा

Aug 04,2011 07:30:05 PM IST

बहुतेक वेळा आपण दुस-यांच्या सल्ल्याने वागत असतो. काही लोक छोट्या-छोट्या निर्णयांसाठीही दुस-यांवर अवलंबून असतात. स्वत:वर श्रद्धा नसल्याचा हा परिणाम आहे. कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील, याकडे अधिक लक्ष देवू नये. लोकांच्या म्हणण्यानुसार आपण वागू लागतो तेव्हा आपले मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो.
आपण स्वत:वर श्रद्धा ठेवू लागलो की हळूहळू आपल्या योग्यतेत वाढ होऊ लागेल. चांगल्या आणि वाईट दोन्ही स्थितीत निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात विकसित होऊ लागेल. आपल्याला जीवन जगताना बाग आणि जंगल या दोन्हींचे आदर्श ठेवावे लागते.
बागेत झाडं-झुडपं अतिशय व्यवस्थित रूपात तयार केले जातात. माळी त्या झाडांची निगा राखतो. बागेत सारे काही सुरक्षित असते. तिथे सजावट असते. सुंदर फुले उमललेली असतात. आपले जीवनही असे बागेसारखे असावे. परंतु ही जीवनाची एक बाजू झाली. दुसरी बाजू जंगलाप्रमाणे असावी. जंगल हे नैसर्गिक असते. येथे कोणी मालक किंवा माळी नसतो. जंगलात संघर्ष असते आणि सौंदर्यही. आपल्या जीवनात बाग आणि जंगल दोन्हींचे महत्त्व असते.
सुविधा आणि संघर्ष दोन्हीही गोष्टी आपल्याला घडवतात. आपली स्वतावर जेवढी श्रद्धा असेल तेवढी आपल्याला परिस्थितीची ओळख होते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य विकास होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते. सत्संगाची जीवनाला जोड असेल तर संघर्षातही आपण योग्य मार्गाने पुढे जाऊ शकतो.

X