Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | if-you-want-to-be-happy-always-try-this

जाणून घ्या... सदैव सुखी आणि आनंदी राहण्याचा शाश्वत मार्ग

धर्म डेस्क | Update - Aug 09, 2011, 07:11 PM IST

आपल्याला कायमस्वरुपी सुख पाहिजे तर आंतरिक सुखाचा शोध घ्या.

  • if-you-want-to-be-happy-always-try-this

    सुखी आणि आनंदी राहण्याचे अनेक मार्ग आहेत. भौतिक जीवनातून सुख मिळविताना एक अडचण असते ती म्हणजे ती भौतिक बाब नष्ट होते तेव्हा आपण पुन्हा दु:खी होतो. क्लबला गेले, टीव्ही पाहिली, खेळ खेळले आणि या बाबींपासून दूर गेले की पुन्हा आपण अशांत होतो. कायमस्वरुपी आनंद देणारी कोणती गोष्ट आहे काय ? आपल्याला कायमस्वरुपी सुख पाहिजे तर आंतरिक सुखाचा शोध घ्या.
    जे लोक या जगात ख-या अर्थाने सुखी आहेत, त्यांनी आपल्या एकांताचा योग्य वापर केला. एकांतात आपल्या अंतर्मनाचा त्यांनी शोध घेतला. कारण यासाठी भौतिक जीवनाच्या धांदलीपासून दूर असणे आवश्यक असते. जेव्हा आपले अंतर्मन विकसित होते तेव्हा आपल्याला इतरांना दुखदायक वाटणा-या गोष्टींपासूनही दु:ख मिळत नाही. या स्थितीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेत अतिशय मार्मिकरीत्या केले आहे. युरोप आणि अमेरिकेत गेल्या तीनशे वर्षांत जेवढ्या प्रमुख चळवळी उभ्या झाल्या त्या चळवळींच्या मुळाशी भगवदगीता होती, हे सत्य खूपच कमी लोकांना माहित आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे ख-या सुखाचा मार्ग जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी भगवदगीता अभ्यासावी.

Trending