Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | importance of time

शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

दिव्य मराठी | Update - Jul 15, 2011, 05:19 PM IST

एखाद्याचे पैसे उसने घेणे आणि परत न करणे याला आपण फसवणूक म्हणतो.

  • importance of time

    आपल्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने करतो, त्यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते. एखाद्याचे पैसे उसने घेणे आणि परत न करणे याला आपण फसवणूक म्हणतो. दिलेली अपॉईंटमेंट न पाळणे हेही तेवढंच आक्षेपार्ह आहे, किंबहुना थोडं जास्तच. कारण, पैसे उशिरा का होईना, पण परत करता येतात. एखाद्याचा फुकट घालवलेला वेळ मात्र आपण कधीच परत करू शकत नाही. 5 वा. येतो म्हटल्यावर आपण ठीक 5 ला हजर राहायलाच पाहिजे! 2 मिनिटं उशीर झाला तरी तो उशीरच!
    झेंडावंदनासाठी एक-एक, दोन-दोन तास बिचारी मुलं उन्हात उभी असतात, अध्यक्ष उशिरा येणार म्हणून. बंदोबस्तासाठी पोलिसांची तासन्‌तास रखडपट्टी होते आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बदलतो. जेवढा गायक मोठा तेवढा तो श्रोत्यांना जास्त ताटकळत ठेवतो. हे सगळं बदलायला हवं! ठरलेल्या दिवसापूर्वी मालाची डिलिव्हरी झाली नाही, तर वॉल मार्टसारखी कंपनी लक्षावधी डॉलर्सची ऑर्डर कॅन्सल करते. सर्जन ऑपरेशन थेटरमध्ये उशिरा आला तर अमेरिकेतला रोगी त्याला कोर्टात खेचू शेकतो.
    दिलेली वेळ पाळणं याचाच अर्थ दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending