आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचा दरवाजा सुंदर आणि आकर्षक असावा, कारण...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून लक्ष्मी घरात प्रवेश करीत असते. त्यामुळे घराचा दरवाजा हा घरतील अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. घराचा दरवाजा हा सुंदर आणि आकर्षक असावा. घराचा दरवाजा आपले नशीबही बदलू शकते.
घराचा दरवाजा नेहमी स्वच्छ असला पाहिजे. विशेष म्हणजे तो तुटलेला नसावा. त्‍यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. आपल्या घराच्या दरवाज्यावरून आपल्या घरातील परिस्थिती लक्षात येत असते. घराचा दरवाजा जर तुटलेला असेल तर त्या घरात नेहमी पैशांची चणचण भासत असते. तुटलेल्‍या दरवाजामुळे नकारात्‍मक ऊर्जा सक्रीय होत असून सकारात्‍मक ऊर्जेला अडथळा निर्माण करत असते. अशा घरात राहणा-या लोकांचे विचारही नकारात्‍मक होऊन जातात.
कोणतेही कार्य करण्‍यापूर्वी आपल्‍या मनात अपयशाचे विचार येतात. त्‍यामुळे आत्‍मविश्‍वास डगमगतो आणि हाती घेतलेले काम बिघडण्‍याची शक्‍यता निर्माण होते. वास्‍तुशास्‍त्रानुसार पाहिल्‍यास ज्‍या घरात स्‍वच्‍छता, सुंदरता असते तिथे महालक्ष्‍मीचे निवास असते. जर एखाद्या घराचा दरवाजा तुटलेला असेल तर त्‍याठिकाणी महालक्ष्‍मीची कृपा नसते. त्‍यामुळे घराचा दरवाजा सुंदर आणि चांगला असला पाहिजे.
या तीन वस्‍तूंमुळे शनीदेव होतील प्रसन्‍न