आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जपाची माळ तयार करताना या गोष्टी लक्षात ठेवा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मै यहां, तुम वहां, जिंदगी है कहां.. या बागबान चित्रपटातील गाण्याचा प्रत्यय बीड तालुक्यातील पाली येथील देवकुळ कुटुंबात अनुभवायला मिळाला. एका मुलाकडे आई तर दुसर्‍या मुलाकडे वडील राहत होते. अखेर चार वर्षांनंतर महालोकअदालतीमुळे विभक्त झालेले आई-वडील रविवारी एकत्र आले आणि कुटुंबाचे धागेही जुळून आले.
पिंपळादेवी येथील शाहूराव देवकुळ व पत्नी शशिकला रोजगाराच्या शोधात पाली येथे स्थिरावले. त्यांना दोन मुले, गोपीनाथ आणि भागवत. शाहूराव व शशिकला दोघांनी मजुरी, शेतीचे कामे करून संसाराचा गाडा ओढत दोन्ही मुलांना शिकविले. थोरला गोपीनाथ शिक्षक झाला. धाकटा भागवत बारावी शिकला. दोघांचे लग्न झाले. चार वर्षांपूर्वी घरात मतभेद झाले. गोपीनाथ वेगळा राहू लागला. नंतर दोन्ही मुलांनी व सुनांनी एकाकडे आई व एकाकडे वडील राहतील असे ठरवून जणू वाटणी केली. आईवडिलांनी मन मोठे करून नाराज न होता मुले व सुनांच्या निर्णयाला होकार दिला. दोन-तीन वर्षे झाली परंतु नात्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. भविष्यात घर आणि शेतीचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती त्यांच्या मनात होती. भागवतने अँड. संगीता धसे यांच्यामार्फत दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. कौटुंबिक वाद समोर आल्यानंतर आईवडिलांना कोण सांभाळणार अशी न्यायालयाने विचारणा केली. गोपीनाथच्या बाजूने अँड. रवींद्र देशमुख बाजू मांडत होते. कुटुंबाची विस्कटणारी घडी पुन्हा व्यवस्थित व्हावी या भूमिकेतून अँड. देशमुख, अँड. संगीता धसे, अँड. अनिल धसे यांच्या प्रय}ांना मूर्त रूप मिळाले. महालोक अदालतीत हे प्रकरण दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर बी.एच. मोरे यांच्यासमोर गेले. त्यात घर व शेतीची तडजोडी करण्यात आली विशेष करून वेगवेगळे झालेले आई-वडिलांसह कुटुंब एकत्र केले.