आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशा पद्धतीने करा जपमाळेची पूजा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - राजेगावातील अडीच वर्षापूर्वी अंगणवाडी बांधकामासाठी आलेला सहा लाखांच्या निधीचा भ्रष्टाचार करण्यात आला. अडीच वर्षापूर्वी निधी देऊन गावची अंगणवाडी उघड्यावर भरत असल्याने चौकशी करण्याची माणी होत आहे.
येथे अंगणवाडीला मंजुरी मिळाली. मात्र, गावच्या सरपंच, ग्रामसेवक व अभियंत्यांनी अंगणवाड्याचे काम कागदोपत्री दाखवले. संबंधित अभियंत्याने त्या दोन वर्ग खोल्याची एम.बी.बनवली. एम. बी. वर इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्या कामाचा निधी ग्रामपंचायतीचे सरपंच रामहरी मेटे व ग्रामसेवकांनी उचलून घेतला. गावासाठी आलेल्या दोन्ही अंगणवाड्याचा निधी इमारतीवर खर्च झाला नाही. त्यामुळे आजही गावची अंगणवाडी उघड्यावर भरत आहे. तालुक्यातील या गावाची ओळख आमदार विनायक मेटे यांचे गाव म्हणून होते, परंतु त्यांच्याच बंधूने अंगणवाडीसाठी आलेला निधी उचलला. त्यांच्या पत्नी वैशाली मेटे या दरम्यानच्या काळात केज पंचायत समितीच्या सभापतीदेखील होत्या. राजेगाव क्रमांक 1 व 2 या अंगणवाड्या येथील मंदिराच्या समोर उघड्यावर भरतात, ऊन,वारा, पावसात मुले उघड्यावर थांबत आहेत. राजेगाव येथील अंगणवाड्यांबाबत पंचनामा करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश तहसीलदार रवींद्र पाठशेवार यांनी मंडळ अधिकार्‍यास दिले आहेत. काय कारवाई होते याकडे राजेगाव येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.