Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | jeevan mantra, signature, nature

स्वाक्षरीवरुन कळतो आपल्याला व्यक्तीचा स्वभाव!

दिव्य मराठी टीम | Update - Jul 23, 2011, 05:35 PM IST

व्यक्तिच्या स्वभावाची ओळख त्याची स्वाक्षरी करून देत असते. व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना अनेक बाबींचे अध्ययन केले जात असते. स्वाक्षरी अर्थात ऑटोग्राफवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखणे आता सहज शक्य झाले आहे.

  • jeevan mantra, signature, nature

    व्यक्तिच्या स्वभावाची ओळख त्याची स्वाक्षरी करून देत असते. व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना अनेक बाबींचे अध्ययन केले जात असते. स्वाक्षरी अर्थात ऑटोग्राफवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखणे आता सहज शक्य झाले आहे.
    स्वाक्षरी आणि स्वभाव:
    अनेकांना आपल्या स्वाक्षरीचे अप्रुप असते. काही तर सारखे आपल्या स्वाक्षरीचा सराव करीत असतात. अशा व्यक्ती आत्मकेंद्री मानल्या जातात. अशा व्यक्तिंमध्ये अहंमपणा अधिक असतो. मीच हुशार अन् बाकी ‘ढ’ अशी त्यांची धारणा असते. काही व्यक्तींची स्वाक्षरी अतिशय छोटी असते. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो. आपल्या स्वाक्षरीत झाड, फुले, हसरा चेहरा काढणारी व्यक्ती दुसºयांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असते. तर आपल्या स्वाक्षरीत गोलाकार काढणारी व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात. काही प्रसंगी त्यांच्यात अतिआत्मविश्वास असल्याचेही जाणवते. काही व्यक्तीतर आपल्या नावापेक्षा आडनावच अधिक गडद करण्याचा प्रयत्न करतात. अशी व्यक्ती आपल्या कुळाला प्राधान्य देणारी असते. आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो, हे त्यातून त्याला दाखवून द्यायचे असते. काही व्यक्ती आपल्या स्वाक्षरीमध्ये इंग्रजी अथवा अन्य भाषांचा वापर करतात. अशा व्यक्तीचे ध्येय अनिश्चित असते. त्यांना कोणत्याही गोष्टीचे नियोजन करायला आवडत नाही. त्यांच्या या स्वभावाचा त्यांच्या करिअरवर विपरीत परिणाम होत असतो.
    काही व्यक्ती स्वाक्षरी करताना तुटक-तुटक अक्षरे काढतात. अशा व्यक्तींना एकाकी राहणे पसंत असते. त्यांना कोणाशीही काही घेणे-देणे नाही. आपण भले आणि आपलं जग भलं, असा त्यांचा स्वभाव असतो. काही जण आपल्या स्वाक्षरीखाली रेषा ओढतात. स्वाक्षरीखाली सरळ रेषा ओढणारे व्यक्ती परखड मतांचे असतात. वक्र आणि तिरकस रेषा ओढणारे व्यक्ती मुडी असतात.

Trending