आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगलेल्या मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परमेश्वर अनंत, अविनाशी, संपूर्ण आणि सर्वत्र चराचरात पसरलेला आहे. परमेश्वराची भक्ति करण्यासाठी परमेश्वराची मूर्तीच पाहिजे असा काही नियम नाही. परंतु परमेश्वराची आराधना करताना त्याच्याशी एकरूप होण्यासाठी मूर्ती पूजा केली जाते.
परमेश्वराच्या भक्तित मूर्ती पुजेला अत्याधिक महत्त्व आहे. परंतु मूर्तीचे पूजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भंगलेल्या मूर्तीची पूजा करणे हे अशुभ मानले जाते. अशा भंगलेल्या मूर्ती देव घरात ठेऊ नये. त्यामुळे परमेश्वराची आराधना करताना आपल्री एकाग्रता खंडीत होत असते. मंदिरात गेल्या नंतर परमेश्वराची मूर्ती पाहिताक्षणी आपले मनात भक्तिरस जागृत होतो. जर आपण एकाद्या भंगलेल्या मूर्तीची पूजा करताना आपले मूर्तीच्या भंगलेल्या भागाकडे लक्ष जावून आपले लक्ष विचलीत होत असते. भंगलेल्या मूर्तीची पूजा करणे हे अशुभ मानले जाते. घरातील देवघरात भंगलेली मूर्ती असेल तर घरात अशांती पसरते. देवाची आराधना करण्यात कोणालाच रस येत नाही. आपण परमेश्वरापासून दूरावलो जातो. आपल्याला प्रसंगी मोठ्या नुकसानालाही सामोरे जावे लागते.