Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | just-remember-these-things

स्मरणशक्ती : केवळ याच गोष्टी आपल्या ध्यानात ठेवा...

धर्म डेस्क | Update - Aug 07, 2011, 03:51 PM IST

चांगली स्मरणशक्ती याचा अर्थ असा नाही की सर्वच गोष्टी आपल्या ध्यानात ठेवाव्यात.

  • just-remember-these-things

    चांगली स्मरणशक्ती याचा अर्थ असा नाही की सर्वच गोष्टी आपल्या ध्यानात ठेवाव्यात. ज्या गोष्टी विसरण्यायोग्य आहेत त्या विसरणे म्हणजेही स्मरणशक्तीच होय. एखादी गोष्ट ध्यानात ठेवायला शक्ती खर्च होते. परंतु विसरण्यासाठी त्याहून अधिक शक्ती खर्च होत असते.
    स्मरणशक्ती ही लाभदायी असली पाहिजे. ज्या गोष्टी आनंद देणा-या आहेत, चित्त हलके करणा-या आहेत, त्याच ध्यानात ठेवा. ज्या गोष्टी ध्यानात ठेवल्याने निराशा, जडता, खिन्नता येते त्या गोष्टी आठवायच्याच कशाला. स्मरणशक्तीलाही रिचार्ज करावा लागतो. सतत मेमरी फुल्ल ठेवणे योग्य नाही. अधून मधून मेमरी रिकामी केली पाहिजे. रिफ्रेश करण्याची कला शिकून घेतली पाहिजे. जे लोक अधिक ध्यानात ठेवतात ते डिप्रेशनमध्ये जातात.
    आठवणीतल्या गोष्टींची साफसफाई चांगल्या प्रकारे न केल्यास एक प्रकारचा आजार जडतो. ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या वेळेवर आठवत नाहीत आणि फालतूच्या गोष्टी मात्र डोक्यात येत राहतात. आपल्या विचारांचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न केल्यास, ज्या विचारांमुळे आपल्याला ताजे तवाने वाटते अशा विचारांशी स्वताला जोडून घेतल्यास आपले डोके आपोआप योग्य गोष्टी स्मरणात ठेवू लागेल आणि अनावश्यक तण विसरून जाईल.

Trending