Home »Jeevan Mantra »Jyotish» Jyotish Article Rashi Horisscope

जाणून घ्या...अशा लोकांचे स्त्रियांशी फारसे जमत नाही!

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 25, 2012, 15:38 PM IST

  • जाणून घ्या...अशा लोकांचे स्त्रियांशी फारसे जमत नाही!

कर्क लग्न कुंडलीमधील सप्तम आणि अष्टम स्थानात मंगळ असेल तर अशा व्यक्तीचे स्त्रियांशी फारसे जमत नाही. त्यांच्यात प्रचंड मतभेद असतात.
कर्क लग्न कुंडलीच्या सप्तम स्थानात मंगळ असेल तर...
कुंडलीतील सप्तम स्थान स्त्री आणि व्यवसायाशी संबंधित असते. या लग्न राशीतील सप्तम स्थान मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनीच्या या राशीत मंगळ असल्याने व्यक्ती आणि स्त्रियांमध्ये कमालीचे मतभेद असतात. मात्र, व्यवसाय क्षेत्रात या लोकांना विशेष प्राविण्‍य प्राप्त होत असते. या शिवाय विद्या, बुद्धी आणि संततीबाबत सुख मिळत असते. धनसंपत्ती खूप असल्याने अशा व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते. या लोकांची वाणी चांगली असल्याने इतरांवर त्याचा खास प्रभाव पडत असतो.
कर्क लग्न कुंडलीत अष्टम स्थानात मंगळ असेल तर...
कर्क लग्न कुंडलीत अष्टम स्थानात कुंभ राशीचे स्थान आहे आणि त्याचा स्वामी शनी आहे. हे स्थान आयुष्य आणि पुरातत्वाशी संबंधित असते. येथे मंगळ असल्याने व्यक्तीला आयुष्‍याबाबत कोणत्याच अडचणी निर्माण होत नाही. परंतु व्यवसाय, शिक्षण आणि बुद्धीबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बंधुप्रेम लाभते. कौटुंबिक सुख प्राप्त होत असते.

Next Article

Recommended