आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jyotish Lunar Eclipse On 4 How Long Where Will Appear Which Take Care Of Things

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्या चंद्रग्रहण; जाणून घ्या काय करावे अन् काय करू नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या सोमवारी (4 जून) ज्येष्ठ शुक्ल पोर्णिमा असून याच दिवशी खंण्डग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण ज्येष्‍ठा नक्षत्र, वृश्चिक राशीत होणार आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार नसून ते आपल्यासाठी विशेष नसल्याचे ज्योतिषशास्त्रज्ञांनी सांगितले.
दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी ग्रहण सुरू होणार असून सध्याकाळी 5 वाजून 39 मिनिटांना ते समाप्त होणार आहे. या ग्रहणाचा सुतक काळ 4 जूनला सूर्योदयासोबत सुरु होणार आहे. ग्रहणाचा एकूण काळ तीन तास 9 मिनिटांचा असेल. आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमे‍रिका पॅसि‍फिक महासागर आदी देशात दिसणार आहे.
या गोष्टी ध्यानात ठेवा-
धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात इष्टदेवची आराधना करावी. गुरूच्या मंत्राचा जप करावा. धार्मिक कथांचे वाचन करावे. श्रीरामप्रभुचे नामस्मरण करावे. ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. स्वयंपाक करू नये. विशेष म्हणजे ग्रहण काळात सेक्स टाळावा. ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घराची शुद्धीकरण करून दानधर्म केले पाहिजे.
या लोकांनी ग्रहण पाहू नये-
ज्यांचा जन्म नक्षत्र, जन्मराशी, जन्म लग्नात झाले असेल अशा लोकांनी ग्रहण पाहू नये. ग्रहण सुरू झाल्यानंतर लगेच स्नान करून जप तसेच धार्मिक कथांचे पठन करावे. ग्रहण सुटल्यानंतर देवाची पूजा करून दानधर्म करावे. त्यानंतर पुन्हा स्नान करावे.
सन २०१२ मध्ये होणार दोन सूर्य आणि एक चंद्रग्रहण