Home | Jeevan Mantra | Dharm | kalki-jayanti-today-kalyug-s-end-will-incarnation-of-god

कलीयुगाच्या शेवटी होईल भगवान विष्णुचा कल्की अवतार

धर्म डेस्क | Update - Aug 05, 2011, 06:55 PM IST

पुराणांमध्ये भगवान विष्णुंच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे.

  • kalki-jayanti-today-kalyug-s-end-will-incarnation-of-god

    पुराणांमध्ये भगवान विष्णुंच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे. आजवर नऊ अवतार झाले आहेत. दहावा अवतार होणे शेष आहे. धर्मग्रंथांनुसार दहावा अवतार कल्कीचा असेल. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात षष्ठीला हा अवतार पृथ्वीतलावर जन्मास येईल. म्हणूनच या दिवशी कल्की जयंती साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा ही जयंती 5 ऑगस्ट रोजी आली आहे.
    धर्मग्रंथांमध्ये कल्की अवताराविषयी विस्तृत वर्णन आहे. हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संधीकालात होईल. 64 कलांनी युक्त असा हा अवतार असेल. पुराणांमधील उल्लेखानुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात शंभल नामक स्थानी विष्णुयशा नामक तपस्व्याच्या घरी भगवान कल्की यांचा पुत्र रुपात जन्म होईल. कल्की देवदत्त नामक घोड्यावर स्वार होऊन जगातल्या पापी लोकांचा संहार करतील. धर्माची पुनर्स्थापना करतील.
    अवतार होण्यापूर्वी पूजा होत असलेला हा एकमेव अवतार आहे. त्यामुळेच कल्कीची अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत. जयपूरच्या हवा महालासमोर कल्कीचे प्रसिद्ध मंदिर आहे.Trending