आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविचारी कर्म कधीही पश्चात्तापच देते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचार करण्याचे शिक्षण देणारी एक जातक कथा आहे. एका जुन्या हवेलीत एक वृद्ध महिला राहत होती. ती एकटीच होती. कामासाठी तिने नोकर-चाकर ठेवले होते. त्या वृद्धेजवळ एक पोपट होता. तो अत्यंत इमानदार होता. वृद्ध महिलाही पोपटावर फार प्रेम करीत असे. कारण वृद्धेला वेळ बघता येत नसे. त्यामुळे ती पोपटाने उठवल्यावर उठायची. पोपट तिला सकाळ होताच उठवायचा. त्यानंतर ती आपल्या नोकरांना उठवून घरातली कामे सांगायची. त्यामुळे नोकर त्या पोपटावर फार चिडत असत. पोपटाला मारून टाकल्यावर ही समस्या सुटेल, असा विचार करून त्यांनी एके दिवशी संधी पाहून पोपटाला मारून टाकले. पोपटाच्या मृत्यूनंतर वृद्धेला वेळेचा काही अंदाज येत नसे. त्यामुळे जेव्हा तिला जाग येई, तेव्हाच ती नोकरांना काम सांगायची. आता तर त्या लोकांजवळ आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच उरले नव्हते.
तात्पर्य - कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामांवर एकदा अवश्य विचार करायला हवा. कारण अविचारी कर्म कधीही प्रतिकूल परिणामच देते.