Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | karma lines how makes

अशा बनतात आपल्या कर्माच्या रेखा ...

धर्म डेस्क | Update - Jul 13, 2011, 11:16 AM IST

स्वामी सत्यमित्रानंदजी एके ठिकाणी सांगतात, कर्माचा प्रारंभ म्हणजे संकल्पाचा बिंदू.

 • karma lines how makes

  विचारांतून संकल्प, संकल्पांतून क्रिया आणि मग परिणाम समोर येतात. यातील एकही कडी दुर्बल झाली तर आपसांत ताळमेळ राहणार नाही. स्वामी सत्यमित्रानंदजी एके ठिकाणी सांगतात, कर्माचा प्रारंभ म्हणजे संकल्पाचा बिंदू.
  संकल्पातून हळूहळू रेखा बनतात. मग त्यातून महल बनेल अथवा मित्र बनतील. पूल बांधायचे झाले तरी आधी रेखा ओढणे आवश्यकच आहे. त्या रेखांच्या आधारावरच पुलाची निर्मिती होईल. मानवी मनात संकल्पाचे बिंदू तयार होताच कर्माच्या रेखा ओढल्या जातात.
  माणसासोबत सुसंस्कार असतील तर तो रामाचा प्रतिनिधी बनेल. स्वत: राममय होईल. संकल्प सांभाळता आले नाही आणि पूर्वीचे कुसंस्कार जागे झाले तर माणूस दानव बनून जातो की जो इतरांना त्रासदायी ठरतो. थोडक्यात सांगायचे तर कोणतेही काम करताना संकल्प शुद्धच असले पाहिजे.
  आपल्या संस्कृतीत कल्याणासाठी शुभ संकल्प आवश्यक असल्याचे म्हटले आहे. संकल्प अशुद्ध असल्यास वासनेच्या गर्तेत पडणे ठरलेलेच. शुभ संकल्पाने कामाला सुरुवात केलात तर त्या कामाच्या नैसर्गिक दोषांपासून तुम्ही मुक्त व्हाल. कर्म व्यवहारिक जीवनाशी निगडीत आहे. व्यावहारिक जीवनात चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. शुभ संकल्पामुळे आपण चांगल्या पक्षाशी जोडलेले असू. याने जीवनाचे सृजन होईल, विध्वंस नव्हे. अशा संकल्पामुळे समाजातील भेदभाव मिटेल. धनाची शुद्धता पाळली जाईल. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अशा आजारांतून मुक्ती मिळेल.
  स्वामी रामदेव यांची चळवळ योगाशी जोडली गेलीय. त्यामुळे ती शुभ संकल्पाशी निगडीत आहे. राष्ट्रहितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. तरीही आंदोलनाच्या प्रामाणिकतेबद्दल जनतेच्या मनात आदरच निर्माण होईल.

Trending