Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | katha-wow-if-rich-as-andrew-carnegie

वाह ! श्रीमंती असावी तर अ‍ँड्रयू कारनेजी यांच्यासारखी...

धर्म डेस्क | Update - Aug 11, 2011, 12:16 PM IST

पैसा, प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊनही शालीनता जपणारी माणसं खूपच कमी असतात.

 • katha-wow-if-rich-as-andrew-carnegie

  जगाच्या इतिहासात एकाहून एक श्रीमंत माणसं होऊन गेली आहेत. परंतु श्रीमंती सार्थकी लागल्याची उदाहरणे मात्र बोटावर मोजण्याइतकीच. श्रीमंती आल्यानंतर माणसं अहंकारी, स्वार्थी आणि विलासी बनतात, असे बहुतेक वेळा पाहायला मिळते. पैसा, प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊनही शालीनता जपणारी माणसं खूपच कमी असतात.
  धन संपत्ती ही कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. परिश्रम, सौभाग्य आणि पूर्वजन्मपुण्याईमुळे धनप्राप्ती होते. या श्रीमंतीचा वापर सार्थक कार्यासाठी करणा-या व्यक्तींचे नावे इतिहासात अजरामर होतात. ते अनेकांचे प्रेरणास्रोत बनतात.
  येथे आपण अ‍ँड्रयू कारनेजी यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग पाहणार आहोत. 100 वर्षे होऊनही ते आजही अनेकांचे प्रेरणास्थान आहेत...
  त्या काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींत दुस-या क्रमांकावर असणा-या कार्नेजी यांचा जन्म एका गरीब परिवारात झाला. वडिल कारखान्यात काम करीत आणि आई चपल्या शिवून संसाराला ठिगळ लावायची. अशा कठीण परिस्थितीत दुस-यांकडून पुस्तके घेऊन कार्नेजी यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कठोर परिश्रम केले आणि टेलीग्राफ ऑपरेटर बनले. नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी परिश्रम थांबविला नाही. कठोर परिश्रम आणि अदम्य इच्छाशक्ती या बळावर ते जगातील विशाल अशा स्टील कंपनीचे मालक बनले.
  गौरवास्पद बाब म्हणजे त्या काळी अन्य श्रीमंत मंडळी ऐश आरामात संपत्ती उधळत असताना कारनेजी यांनी आपली निम्मी संपत्ती इंग्लंड, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात मोफत वाचनालये आणि विद्यापीठे स्थापन करण्यात खर्च केली.
  ते म्हणायचे की, 'पैशाच्या अभावात आपल्याला शिक्षण घेताना अडचणी आल्या तशा अडचणी इतरांना येवू नयेत. गरीबीमुळे कोणाच्याही शिक्षणात खंड पडू नये.'

Trending