आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडघेदुखीकडे कानाडोळा करू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालताना, धावताना, लाथ मारताना किंवा बसताना होणार्‍या हालचालींना मदत करणे हे गुडघ्याचे प्रमुख कार्य आहे. गुडघ्याला इजा झाल्यास त्याचा गुडघ्याच्या सर्वच हालचालींवर परिणाम होतो. अशावेळी याकडे कानाडोळा न करता वेळेवर उपचार करणे खूप आवश्यक आहे.
वेळीच सावध व्हा
गुडघ्याला इजा झाल्यावर सहजासहजी न ओळखू येणारे अनेक संकेत मिळतात..
१> तीव्र वेदना आणि सूज येणे.
२> गुडघ्यात वाकताना त्रास होणे.
३> वजन सहन करता न येणे.
डॉक्टरांशी संपर्क साधा
गुडघ्याला झालेल्या इजेकडे दीर्घ काळ कानाडोळा करणे हानिकारक ठरू शकते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधणे फायद्याचे ठरते.
१> वेदना असह्य झाल्यास.
२> गुडघ्याचा आकार बिघडू लागला असल्यास.
३> इजा झालेली जागा बधीर पडू लागल्यास.
४> पाय थंड पडू लागल्यास.
५> इजा झालेली जागा लाल पडू लागल्यास.
आराम करणे, बर्फाने शेकणे किंवा बँडेज बांधल्यावरदेखील आराम पडत नसेल तर उपचार घेण्याची गरज आहे, हे पीडिताच्या लक्षात येणे आवश्यक आहे.
हे आहेत सोपे उपाय
एखाद्या खेळाडूच्याच गुडघ्याला इजा होते असे नाही. हा त्रास कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
• वजनावर नियंत्रण ठेवा. अधिक वजनामुळे गुडघ्यांवर जास्त दबाव पडतो.
• पायांचे अलाइनमेंट योग्य ठेवणारा बूट घालावा. बुटाची फिटिंग योग्य नसल्याने इजा होण्याचा धोका वाढतो.
• व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करावे. यामुळे मांड्यांच्या पुढच्या आणि मागच्या स्नायूंवर ताण पडणार नाही.
• गुडघ्याच्या बळकटीसाठी कमी कष्टाचा व्यायाम करावा.
• पोहणे किंवा चालणे हासुद्धा चांगला पर्याय आहे. यामुळे पायांचे स्नायू बळकट होतील आणि गुडघ्यांची कार्यक्षमता वाढेल.
• जे लोक व्यायाम किंवा शारीरिकरीत्या अधिक मेहनत करतात त्या लोकांच्या गुडघ्याला इजा होण्याची जास्त शक्यता असते, असे सिद्ध झाले आहे.
पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे कानाडोळा; करा हे उपाय