आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या हे ५ सोपे शनी मंत्र, व्हाल धनवान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायाचा देवता शनी देव, त्यांच्या अनेक कारणांमुळे त्यांना विलक्षण देवता असे मानले गेले आहे. शनीची गती मंद म्हणजे संथ आहे असे मानले जाते, तर दृष्टी वक्र म्हणजे वाकडी असे सांगितले जाते. शनी देवाची न्याय करण्याची पद्धत एकदम सरळ आहे. ज्यांचे कर्म चांगले आहेत त्यांच्यावर कृपा करणे आणि ज्यांचे कर्म वाईट आहेत त्यांना दंडित करणे. याच कारणांमुळे शनिदेवाची शुभ दृष्टी भाग्यकारक असते असे मानले जाते. मनुष्यावर जर त्यांची वक्र दृष्टी पडली तर फार वाईट गोष्टी आयुष्यात घडतात.
शनीची महादशा, साडेसाती चालू असताना आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून, शास्त्रात काही मंत्र सांगितले गेले आहेत. या शनी मंत्रांचा जप केल्याने रोजगार, सुख-समृद्धी यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. शनी मंत्राचा जप केल्याने मनुष्याला वैभव प्राप्त होते. आयुष्य सुखी होते. सर्व चिंता समाप्त होतात.
शनिवारी किंवा दररोज शनी मंदिरात जाऊन शनी देवाच्या पाषाणाच्या मूर्तीला मोहरी किंवा तिळाचे तेल, काळे तीळ, काळे वस्त्र, उडीद, अर्पण करावेत. घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी खाली दिलेल्या शनी मंत्राचा जप करा...
ॐ धनदाय नम:
ॐ मन्दाय नम:
ॐ मन्दचेष्टाय नम:
ॐ क्रूराय नम:
ॐ भानुपुत्राय नम:
- पूजा व जप झाल्यानंतर तेलाच्या दिव्याने शनी देवाची आरती करा. दोष दूर होण्यासाठी क्षमा प्रार्थना करा.
पुत्ररत्न प्राप्तीसाठी आज करा शनी प्रदोष व्रत
तुमच्या कुंडलीत शनी आहे की नाही हे ओळखा आणि करा उपाय
शनी मंदिरात पादत्राणे का सोडली जातात?
शनी ग्रहाच्या प्रभावाने हे लोक बनतात भाग्यवान....