Home | Jeevan Mantra | Dharm | know-why-snake-make-dance

जाणून घ्या... नागाच्या डोलण्यामागचे विज्ञान

धर्म डेस्क | Update - Aug 04, 2011, 07:51 PM IST

आपल्या देशात प्राचीन काळापासून नागांची पूजा केली जाते.

  • know-why-snake-make-dance

    आपल्या देशात प्राचीन काळापासून नागांची पूजा केली जाते. नागांचा अधिपती शिव आहे. भगवान शिवशंकराचे आभूषण नाग आहे. कणाकणांत ईश्वर आहे, याचीच प्रचिती आपल्याला नागपंचमीसारख्या सणांतून येत असते. गारुड्याच्या पुंगीवर नाग डोलताना आपण नेहमी पाहतो. परंतु नागाच्या या डोलण्यामागचे विज्ञान काय आहे, याची कल्पना बहुतेकांना नसते.
    तसे पाहिले तर नागांना कर्ण रंध्र किंवा कान नसतात. परंतु नागाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते. जमीन आणि हवेत होणारी कंपने आणि हालचालीसुद्धा नागाच्या त्वचेला आणि नाकाला जाणवतात. अशा रीतीने डोळे आणि नागाचे शरीरच जणु कानाचे काम करतात. गारुडी जेव्हा पुंगी वाजवतो तेव्हा आवाज एकून नव्हे तर पुंगीच्या हालचालीकडे पाहूनच नाग डोलू लागतो. यालाच आपण सर्पदेवता प्रसन्न झाल्याचे मानतो.
    सर्पपूजा करण्यामागे निसर्गाचे रक्षण व्हावे हा भाव आहे. तो विसरून कर्मकांडातून आपण निसर्गाला धोका तर पोहोचवत नाही ना, याचा विचार व्हावा. नागपंचमीने निसर्गाचे, नागांचे, सापांचे संरक्षण व्हावे इतकेच.

Trending