आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दु:खापासून धडा घ्या आणि विजय प्राप्त करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सफलता प्रत्येक प्रयत्नांचा आधार आहे. आई-वडील, मुले, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र, नातेवाईक, विद्यार्थी आणि व्यावसायिक म्हणूनही सफलता जीवनाचा आधार बनून जाते. कायमस्वरूपी सफलता निश्चित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले सामर्थ्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. एक व्यक्ती जीवनात काय प्राप्त करू शकते, याचे मदर तेरेसा हे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्या भारतात आल्या होत्या. मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी मिशन हाती घेतले. त्यांच्यासारखे दुसरे उदाहरण नाही. त्यांच्या उदाहरणातून कोणीही प्रेरणा घेऊ शकतो.
मदर तेरेसांबाबत एक सुंदर गोष्ट आहे. आपली सेवाभावी संस्था चालवण्याकरिता अर्थसाहाय्य घेण्यासाठी त्या कोलकात्यामधील एका व्यावसायिकाकडे गेल्या. काहीतरी कारणांमुळे ती व्यक्ती हैराण होती. त्यातच मदर तेरेसांनी पैसे मागितल्यामुळे तो उलटसुलट बोलू लागला. मदर तेरेसांनी शांतपणे त्याचे ऐकून घेतले. जेव्हा तो शांत झाला तेव्हा मदर तेरेसांनी त्याला विचारले, ‘एवढे हैराण का आहात?’ त्यावर ती व्यक्ती उत्तरली,‘शेअर बाजारात मी जी गुंतवणूक केली होती, ती सर्वच बुडाल्याचे माझ्या स्टॉक ब्रोकरने मला फोनवर सांगितले आहे.’
मदर तेरेसांनी त्याला दुसरा प्रश्न विचारला, ‘तुमच्याकडे जे काही होते ते सर्वच बुडाले की तुम्ही शेअर बाजारात केलेली गुंतवणूकच बुडाली?’ तो व्यावसायिक शांत झाला. थोड्या वेळाने तो हसला आणि म्हणाला, ‘माझे फार काही नुकसान झालेले नाही. अजूनही माझ्याकडे खूप काही शिल्लक आहे.’ त्याच्याकडे खूप काही शिल्लक असल्याबद्दल मदर तेरेसांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि ज्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही अशा लोकांच्या सेवेसाठी त्यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. तो व्यावसायिक पुन्हा गप्प झाला. तो उठून उभा राहिला आणि त्याने मदर तेरेसांना पदस्पर्श केला. तेव्हापासून आयुष्यभर तो मदर तेरेसांच्या संस्थेसाठी दान देत राहिला. ‘दु:खे अपरिहार्य आहेत, मात्र त्याने पीडित होणे ऐच्छिक आहे’ याचेच उदाहरण मदर तेरेसांनी घालून दिले. अनेक वेळा ‘भयाच्या पुढे विजय आहे’ अशा जाहिराती लोकांना भ्रमिष्ट करतात. ‘भयाच्या पुढे दु:ख, दु:खाच्या पुढे शिकवण आणि शिकवणीच्या पुढे विजय आहे,’ हा वस्तुपाठ आपण मदर तेरेसा आणि त्यांच्यासारख्या अन्य सफल व्यक्तींकडून शिकला पाहिजे.'
विजय बत्रा
प्रेरक वक्ता, नवी दिल्ली, 10 वर्षे न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य.
vijay.batra@dainikbhaskargroup.com