Home | Jeevan Mantra | Dharm | learn-leadership-by-lord-ganesh

श्रीगणेशाकडून शिका लीडरशिपसाठी आवश्यक गुण

धर्म डेस्क | Update - Sep 01, 2011, 05:29 PM IST

हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेशाचे स्मरण केले जाते.

  • learn-leadership-by-lord-ganesh

    कुटुंब प्रमुख असू द्या की एखाद्या प्रकल्पाचा प्रमुख, दोन्ही ठिकाणी नेतृत्त्व क्षमतेला महत्त्व आहे. हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेशाचे स्मरण केले जाते. श्रीगणेशाच्या अंगी असलेले नेतृत्त्व गुण आपण आत्मसात केले तर यश आपलेच आहे.
    श्रीगणेशाचे एक नाव आहे गणपती. अर्थात गणनायक. गणांचा नायक. गण म्हणजे एका विचाराने भारलेले लोक. त्या समूहाचा नायक अर्थात गणपती. गणपती नावातच नेतृत्त्व भाव आहे. ज्या लोकांचे नेतृत्त्व करायचे आहे, त्यांना एका विचाराने भारले पाहिजे. एक विचार, शिस्त, अनुशासन हे गुण गणांच्या अंगी अपेक्षित आहे. अशा गणांचा नायक अर्थात गणपती.
    श्रीगणेशाच्या गजमुखात नेतृत्त्व क्षमतेचे अदभुत गुण आहेत. हत्ती केवळ बलवानच नाही तर बुद्धीमान प्राणी आहे. याचाच अर्थ असा की कोणालाही नेतृत्त्वपदी राहायचे असेल तर ती व्यक्ती बुद्धीमान असली पाहिजे. चातुर्य असल्याशिवाय नेतृत्त्व करणे कठीण आहे. सजग आणि जागृत राहूनच नेतृत्व करावे लागते.

Trending