आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या सुखात दुसर्‍याचे दु:ख असू नये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला काही प्राप्त व्हावे आणि त्याची झळ दुसर्‍याला बसू नये, हीच जीवनशैली परमात्म्याला पसंत आहे. जगाचा नियम असा आहे की, जेव्हा आपल्याला काही मिळेल तेव्हा दुसर्‍याचे काहीतरी घटेल. सारा हिशेब असाच चालत आहे. स्वास्थ्य घटत आहे, तेव्हा दौलत कमावली जाते. शांतताभंग होते, तेव्हा पैसा मिळतो. आप्तेष्टांशी संबंध बिघडतात आणि जगभरचा जनसंपर्क वाढत जातो. मेहनत कुणीतरी करीत असते, तिजोरी कुणाची तरी भरत असते. जसे आपण आध्यात्माच्या क्षेत्रात उतरू, आपल्याला जाणीव होईल की, येथे असे काही धन आहे, ते आपल्याला मिळतच असते; पण दुसर्‍याचे काही कमी होत नाही. भक्ती केल्याने आपल्या आत प्रेम वाढत असते. म्हणजेच आपल्याशी जोडलेल्या लोकांचे प्रेम अधिक वाढत जाते. आपली वाढ कुणासाठी कमी ठरत नाही. आपल्यात प्रकाश पडला आहे तर तो दुसर्‍याचा अंधार दूर करील. आपल्यात एखादे फूल उमलले तर असे समजा तो दुसर्‍यासाठी बगिचा ठरत असतो. या भावाने जेव्हा आपण संसारात काम करू तेव्हा आपल्याला जाणीव होईल की सुख मिळवायचे आहे; पण दुसर्‍याला दु:ख देऊन नाही. आपल्या सुखात दुसर्‍याचे दु:ख असू नये. कारण असे सुख पुढे जाऊन आपल्याला दु:खात ढकलेल. आज कित्येक लोक धन-दौलत कमवतात तर त्यांना त्यांचे घरचे लोक विचारतात की, आमच्यासाठी काय केले? एकाचे यश दुसर्‍यासाठी अशांततेचे कारण बनत आहे. प्रकरण कुटुंबाचे असेल तर प्रत्येक सदस्याला असे वाटायला हवे की, यात माझाही वाटा आहे. आपल्या प्रगतीमध्ये त्याचे काही कमी झाले नाही,असाच प्रयत्न करत राहा.