Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | life-management-tips-of-acharya-chanakya

जाणून घ्या... चाणक्यांच्या अनुसार आपला सर्वात मोठा आजार कोणता ?

धर्म डेस्क | Update - Sep 12, 2011, 08:06 PM IST

आजार, सदैव दुख आणि यातना देतो. आपण अस्वस्थ होतो, मानसिक शक्तीचे खच्चीकरण होते.

  • life-management-tips-of-acharya-chanakya

    आजार, सदैव दुख आणि यातना देतो. आपण अस्वस्थ होतो, मानसिक शक्तीचे खच्चीकरण होते. आजार अनेक प्रकारचे असतात. आजार हा कधीही वाईटच. प्रत्येक आजारावर एक औषधही असते. या औषधाने आपण बरे होतो. काही आजार शारीरिक असतात तर काही मानसिक.
    शारीरिक आजारांवर औषधाने विजय मिळविता येतो. पण मानसिक किंवा वैचारिक आजारांवर औषधे काम करीत नाहीत. या संबंधात आचार्य चाणक्य यांनी सर्वात घातक आजार म्हणून 'लोभ' या आजाराचा उल्लेख केला आहे. लोभ म्हणजे हाव. ज्या माणसाच्या मनात लालच किंवा हाव सुटते तो पतनाकडे वेगाने सरकू लागतो. हाव हा एक असा आजार आहे की यावर उपचार करणे कठीण आहे. त्यामुळेच आचार्यांनी याला सर्वात मोठा आजार म्हटले आहे.
    ज्या माणसाला हा आजार होतो तो सर्व नात्यांपासून दूर जातो. त्याचे खरे मित्रही दूर जातात. समाजात मान सन्मान मिळणे शक्य होत नाही. हाव डोक्यात शिरली की बुद्धी आणि विवेकही हात सोडून जातात. हाव डोक्यात शिरल्याने माणूस आंधळा होतो आणि तो अधर्माच्या वाटेवरून चालू लागतो. अधर्माच्या वाटेवरून चालणा-यांना कधीही सुख आणि शांती मिळू शकत नाही. त्यामुळे बुद्धीमान मनुष्य सदैव या आजाराला आपल्यापासून दूर ठेवतो.

Trending