चाणक्य नीती 4 / चाणक्य नीती 4 : ज्या गोष्टी लपविण्यासारख्या आहेत त्या गुप्तच ठेवा

धर्म डेस्क

Sep 17,2011 04:15:28 PM IST

अडचणी किंवा दु:ख हे कधीही स्वत: होऊन कोणाच्याही जीवनात येत नाहीत. माणसाचे कर्मच त्याला अडचणीत आणतात. चांगल्या कर्माची फळे उशीराने जरी मिळाली तरी ती चांगलीच असतात आणि वाईट कर्माची फळं वाईट. प्रत्येकाच्या जीवनात काही गोपनीय गोष्टी असतात. या गोष्टी अन्य व्यक्तींना कळाल्याने गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्रत्येकाच्या जीवनात असणा-या गोपनीय गोष्टींविषयी आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. गोपनीय गोष्टी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही सांगू नये. कारण ज्या व्यक्तींना तुमच्या गोपनीय गोष्टी समजतात त्याच व्यक्ती पुढे जाऊन तुमच्यासाठी धोका बनू शकतात. भविष्यात चुकून कोणाशीही मतभेद निर्माण झाले तर समोरची व्यक्ती तुमच्या गोपनीय गोष्टींचा गैरफायदा उठवू शकेल. यामुळे आपण गंभीर संकटात फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माणसाने आपल्या गोपनीय गोष्टी इतरांसमोर कधीही उघड करू नये.
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, गोपनीय गोष्टींना गोपनीयच ठेवा. कोणत्याही परिस्थितीत गोपनीय गोष्टी उघड करू नका.X
COMMENT