आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लो-इम्पॅक्ट एक्झरसाइझद्वारे जाळा कॅलरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज सोपे असतात. त्याबरोबरच ते कॅलरी बर्न करण्याचा आणि फिटनेस कायम ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. त्याउलट हाय-इम्पॅक्ट एक्झरसाइज ऑर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस, लठ्ठपणा, सांधेदुखीस कारणीभूत व गर्भवतींसाठी हानिकारक असतात. त्यामुळे लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करणेच फायद्याचे ठरते. जाणून घेऊया यात कोणत्या व्यायाय प्रकारांचा समावेश होतो आणि त्यातून किती कॅलरी बर्न होतात.
स्केटिंग - सेलिब्रिटी ट्रेनर हॉली पर्किन्स यांच्या मते, नवशिक्यांनी स्केटिंग करताना सावधगिरी बाळगायला हवी, कारण यात सावरण्याची संधी मिळत नाही. नेहमी सपाट जागेवर संरक्षक उपकरणे घालूनच स्केटिंग करा. तोल सांभाळल्यानंतर स्केटिंगदरम्यान दररोज पाचवेळा वर-खाली हालचाल करा.
जुंबा - तसे पाहिले तर हा नृत्याचा एक प्रकार आहे. मात्र, कॅलरी बर्न करण्याबरोबरच तो हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यात संगीताच्या तालावर हातांची हालचाल करावी लागते. त्याचीही वेगळीच गंमत आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, गटागटाने नृत्य केल्यास या व्यायाम प्रकाराचा अधिक आनंद घेता येईल. त्यामुळे दैनंदिन जीवनही सुरळीत राहते.
वॉकिंग - वॉकिंगदरम्यान शरीराचा प्रत्येक स्नायू कार्यप्रवण होतो. पार्किन्सच्या मते, जे लोक नव्याने वॉकिंग सुरू करू इच्छित आहेत, त्यांनी त्याची सुरुवात 10 मिनिटांच्या वॉकने करावी. त्याबरोबरच जोपर्यंत 45 मिनिटांचा वॉक होत नाही, तोपर्यंत दर आठवड्यास दहा टक्के वेळ वाढवावा. तसेच चालण्याची गतीही बदलत राहावी अर्थात कधी अधिक तर कधी मंद.
पाय-या चढणे - शिड्या चढणे-उतरणेही कार्डियो वर्कआउटसारखे आहे. ते कॅलरी बर्न करण्यात व हृदयासाठीही फायदेशीर आहे, कारण त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. हा व्यायाम व्यक्ती कधीही आपल्या सोयीनुसार करू शकते. तज्ज्ञांच्या मते, मॉल वा कार्यालयात लिफ्टचा वापर करण्याऐवजी पाय-यांचाच वापर करावा.
स्वीमिंग - अधिक वजन, सांधेदुखीची समस्या वा ऑर्थरायटिसच्या पीडितांनी पोहू नये, हा निव्वळ गैरसमज आहे. ज्यांच्या शरीरात स्नायू कमी असतात, ते अत्यल्प कॅलरी बर्न करू शकतात. वाढत्या वयाबरोबरच स्नायूंचे नुकसान होते. त्यामुळे लठ्ठपणाला घाबरून पोहण्यापासून दूर राहण्याची चूक कदापि करू नका.
सायकलिंग - यामुळे कॅलरी बर्न होण्याबरोबरच शरीराचा स्टॅमिनाही वाढतो. सायकलिंग करताना वेग कमी-जास्त करत राहावा. त्यामुळे सांध्यांचा लवचीकपणा टिकून राहतो आणि शरीराची सक्रियता वाढते. पर्किन्स यांच्या मते, ज्या लोकांना गुडघ्यांशी निगडित समस्या आहेत, त्यांनी सायकलिंगपासून दूर राहायला हवे. सायकलिंगमुळे गुडघ्यांवर अधिक दबाव पडतो. तो पीडितासाठी अधिक हानिकारकही ठरू शकतो.