आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, या जगाला मृत्युलोक का म्हणतात ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्मास येण्यापूर्वी मनुष्याचा जीव कोठे असतो? मेल्यानंतर त्याचे काय होते? हे सर्व प्रश मनुष्याला पडत असतात. परंतु जन्मलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. मृत्यू आल्यावर कोणाचे काहीही चालत नाही. पण सगळ्यात गूढ असे आहे की, आपल्याला एक दिवस हे जग सोडून जायचे आहे याची सर्वांना खात्री असूनसुद्धा केंव्हा, कोठे व कसे जायचे आहे हे मोठमोठ्यांना कळत नाही. मानवी जीवनात सर्व घटना असंभवनीय असतात. मृत्यूची घटना मात्र शंभर टक्के निश्चित असते. म्हणून या जगास मृत्युभूमी म्हणतात.
त्यामुळे श्रीसमर्थ आपल्या श्लोकातून सांगतात की, मनुष्य जिवंत असतांना मृत्यूस विसरतो व मोठ्या मीपणाने वागतो....
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी |
जिता बोलती सर्वही जीव मी मी |
चिरंजीव हे सर्वही मानिताती |
अकस्मात सांडूनिया सर्व जाती |
मना! खरोखर पहिले तर या जगाला मृत्युलोक म्हणतात.पण माणूस जिवंत असतांना मृत्यूस विसरतो व मोठ्या मीपणाने वागतो. प्रत्येकजण स्वतःला चिरंजीव समजतो. पण मृत्यूची झडप आली म्हणजे माणसाला अकल्पितपणे सर्व काही टाकून जावे लागते.
समर्थांची वाणी : जीवनात स्वार्थ असावा पण...
समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ?
समर्थांची वाणी : मुक्ती प्राप्त करण्यासाठी हे करा...
समर्थांची वाणी : मनुष्याने नेहमी नम्रतेनेच वागावे