आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युनंतर मनुष्य नंतर कोठे जन्म घेतो...?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान असो थोर असो, जन्मास आलेला प्रत्येक जीव आज न उद्या मृत्युच्या तोंडात जाऊन पडतो. जो गेला म्हणून शोक करावा त्याच्या मागोमाग शोक करणा-याचा नंबर लागतो. असा मृत्युलोकाचा व्यवहार आहे.
बरें, जो येथून अकस्मात जातो तो पुनः परत येत नाहीच का ? श्रीसमर्थांचे सांगणे असे की, तो पुनः नवा देह घेऊन जन्मतो. त्याचे असे होते की, माणूस देह सोडतो खरा. पण त्याचे मन अनेक व्यक्तींमध्ये व वस्तूंमध्ये अडकलेले असते. त्या आसक्तीने खेचल्यामुळे तो मृत्युनंतरच्या अवस्थेत फार काळ राहत नाही. त्याचे मन जेथे अडकलेले असते त्याच्या जवळपास तो पुनः जन्म घेतो. अशा रीतीने जीवांना जन्ममरण सोसावे लागते.
मरे एक त्याचा दुजा शोक आहे |
अकस्मात तोही पुढें जात आहे |
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें |
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ||
एक माणूस मरतो व त्याच्यासाठी दुसरा शोक करतो. पण शोक करणारा माणूसदेखील त्याच मार्गावर असल्याने आज ना उद्या मारून जातो. माणसाला देहाची व दृश्य वस्तूंची आसक्ती असते. ती काही केल्या सुटत नाही. आसक्तीमुळे मरणाऱ्या माणसाचे मन अशांत राहते, या जगात गुंतून राहते. त्या कारणाने तो पुनः येथे जन्मास येतो.
समर्थांची वाणी : जीवनात स्वार्थ असावा पण...
समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ?
समर्थांची वाणी : मुक्ती प्राप्त करण्यासाठी हे करा...