Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Management-Tips-Of-Acharya-Chanakya

चाणक्य नीती 3 : खूप मोठी गोष्ट नाही, तुम्हीही बनू शकता महान...

धर्म डेस्क | Sep 16, 2011, 12:43 PM IST

  • चाणक्य नीती 3 : खूप मोठी गोष्ट नाही, तुम्हीही बनू शकता महान...

प्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या व्यक्तिचा जन्म मोठ्या कुटुंबात, संपन्न परिवारात झाले असेल तर त्या व्यक्तिला या सा-या गोष्टी विनाप्रयास मिळून जातात.
समाजात ख्याती कशी प्राप्त करावी ? महान कसे बनावे ? आपल्याला मान सन्मान कसा मिळेल, याविषयी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. कोणत्याही माणसाला महान बनण्यासाठी आवश्यक आहे त्याचे कर्म. व्यक्ती केवळ जन्माने महान बनत नाही. त्यासाठी तिने दृढ निश्चयासोबतच महान कार्य करणे आवश्यक असते. केवळ उच्च कुळात किंवा संपन्न घरात जन्म झाल्याने त्या व्यक्तीचे कल्याण होईल असे नसते. विदवान पित्याचा पुत्र मूर्ख असेल तर त्याला जीवनभर सन्मान प्राप्त होत नाही, असे नेहमीच पाहायला मिळते. याउलट गरीब घरात जन्म घेतलेला माणूसही जर समाज, राष्ट्रासाठी काही उल्लेखनीय काम करेल तर तो महान बनू शकेल.
लक्ष्य निर्धारित करून दृढ निश्चयाने त्या ध्येयाकडे चालत राहणे अत्यावश्यक असते. मार्गात येणा-या कठीण परिस्थिती, प्रसंग यांमुळेच माणूस महान बनत असतो. ज्या माणसाच्या जीवनात अधिक अडचणी, संकटे येतील त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व तितके अधिक उजळून निघते. त्याप्रमाणात माणूस महान होतो. याउलट जो माणूस संकटांना घाबरून आपल्या मार्गावरून भटकतो, तो आपल्या जीवनात कधीच उल्लेखनीय कार्य करू शकत नाही. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करीत दृढ निश्चयाने पुढे जात राहणे यातच महानतेचे रहस्य लपले आहे.चाणक्यांनी सांगितलेल्या या एका सूत्राने बदलेल तुमचे जीवनजाणून घ्या... चाणक्यांच्या अनुसार आपला सर्वात मोठा आजार कोणता ?Next Article

Recommended