मंगळ ग्रहाला लाल / मंगळ ग्रहाला लाल गुलाबाचे अर्पण करतात, असे का?

धर्मडेस्क. उज्जैन

Jul 23,2011 04:46:35 PM IST

मंगळ ग्रहाची पूजा करताना लाल गुलाबाचे फूल आवर्जुन अर्पण करतात. हे आपल्याला माहीत असेल. परंतू,या ग्रहाला लाल गुलाबाचेच फूल का? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. हळद, कुंकू, तांदूळ यासोबत मंगळ ग्रहाला लाल गुलाबाचे फूल वाहिले जाते.
मंगळ अग्नीकारक ग्रह आहे. तसा हा ग्रह शनि ग्रहासारखा संतापी नसला तरी तो तापट स्वभावाचा आहे, हे विसरून चालणार नाही. मंगळ ग्रहाचे स्वरुप लाल आहे. मंगळ ग्रह लाल फूल आणि लाल वस्त्राने प्रसन्न होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या लग्नातही अनेक अडचणी येतात. मंगळाचा राग फार वाईट असतो. त्याचा प्रतिकुल प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी त्याला शितल, शांत पूजा सामग्री अर्पण केल्या जातात.
लाल गुलाबाचे फूल मंगळाचे प्रतिक आहे. गुलाबाचा रस आणि पाणी या दोघांच्या मिश्रणामुळे आपल्या शरीराची दाहकता कमी होऊन आपल्याला गारवा मिळत असतो. मंगळ ग्रहाला लाल गुलाब अर्पण केल्याने आपल्यावर असलेला मंगळाचा क्रोधही शांत होतो.

X
COMMENT