Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | meditation and life

तुमच्या क्रियाशक्तीवर करा मौलिक विचार

पं. विजयशंकर मेहता | Update - Aug 18, 2011, 04:05 AM IST

परमात्म्याचे लौकिक स्वरूप आपल्याला मौलिक बनण्यास मदत करते.

  • meditation and life

    परमात्म्याचे लौकिक स्वरूप आपल्याला मौलिक बनण्यास मदत करते. त्यामुळे आपण मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना केली, अवतारकथा जीवनाशी संलग्न केल्या. या दिव्य आत्म्यांना आपण आपल्या जीवनात आपली मौलिकता उजळून जाईल अशा प्रकारे स्वीकारायला हवे. बहुतांश लोक जगाची पळापळ पाहून स्वत:देखील त्याच्यामागे पळू लागतात. लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टींचे अनुकरण जरूर करायला हवे, पण आपल्याकडेही आपली मौलिक ध्येये असायला हवीत. दुसरे पैसा कमावत आहेत, त्यामुळे आपणही पैसा कमावू नये तर त्यातील उपयुक्तता आणि कमाईमागे आपले मौलिक चिंतन असायला हवे. ही मौलिकता निर्माण करण्यासाठी परमात्म्याशीही आदान-प्रदान करायला हवे. जगात आपण लोकांशी देणीघेणी करता. त्यात भौतिक वस्तू, स्थितींचेही चिंतन असते. त्यामुळे आपण नक्कल करण्यात निष्णात होतो, पण परमात्म्याशीच आदान-प्रदान केले तर आपल्यात मौलिकता निर्माण होईल. ईश्वरीय सत्तेची अनुभूती जेवढ्या निकटतेने होईल तेवढाच आपल्यात आनंद आणि उल्हास जास्त असेल. जगाच्या धावपळीत निश्चितच धावावे लागेल, पण मध्ये थोडा वेळ थांबा आणि तुमच्या क्रियाशक्तीवर मौलिक विचार करा. आपण जे काही करीत आहोत ते कशासाठी आहे हे तुमच्या अंतर्मनाला विचारा. असे विचारण्यातच जीवनातील अनेक सुंदर उत्तरे लपलेली आहेत. थोडे ध्यान आपल्या कल्पना साकार करण्यासाठी अद्भुतपणे सहायक ठरेल.

Trending