जाणून घ्या... घरातील लोकांची मने कधी दुरावतात ?

धर्म डेस्क | Update - Sep 15, 2011, 03:03 PM IST

निरक्षर लोकही समजदार असतात. उच्चशिक्षित लोकही नासमजदार असू शकतात.

  • mind and family

    समजूतदारपणाचा संबंध केवळ शिक्षणाशी नाही. निरक्षर लोकही समजदार असतात. उच्चशिक्षित लोकही नासमजदार असू शकतात. मनाला समजदारीतूनच नियंत्रित केले जाते. समज आपल्यासाठी लाभदायक आहे; मात्र आपल्या मनासाठी तितकीच ती न रुचणारी आहे. त्यामुळे मन हे हरेक समजदारीला विरोध करीत असते. याचा परिणाम जीवनावरही पडत असतो. जीवन सरत असते; मात्र लोक आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराला समजू शकत नाहीत. कारण की मन हे बाधा ठरत असते. यामुळेच लोकांचे जीवन संघर्षमय बनते. जोडीदाराच्या उणिवा सहज आणि सहानुभूतीपूर्वक निपटण्यासाठी मन बाधा निर्माण करते. एक-दुस-याच्या उणिवांवर आक्षेप घेण्यात मनात अनेक विचार येतात. असंतोषाची दुर्गंधी पसरवण्यात मन माहिर असते. जोडीदाराच्या कमतरता पूर्ण करणे गरजेचे असते.
    घराचा अर्थ आहे की एक-दुस-याला समजून घेणे. ज्या दिवशी घरातील एखादा सदस्य मीच श्रेष्ठ आहे आणि बाकी सर्वांनी माझे ऐकायला पाहिजे, अशी समजूत करील तेव्हा घराचे विघटन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जीवनामध्ये मनावर ताबा असायला पाहिजे. लोकांनी एक-दुस-याच्या मनाचा विचार करायला पाहिजे. त्यातून समाधान लाभते.

Trending