आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिरव्या डोळ्यांची गोष्ट आणि माणसाची लालसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक काळातील माणसाचे म्हणणे असते की, सध्या फारच वाईट काळ आला आहे. जगाला जणू आग लागली आहे. माणसाने सज्जनतेचा त्याग केला असून, तो वरचेवर बेइमान होत चाललाय. पण हाच माणूस जेव्हा आपल्या घरात घडलेली एखादी वाईट घटना आठवतो किंवा एखाद्या ज्येष्ठ लेखकाची प्रसिद्ध कथा वाचतो तेव्हा त्याच्या मेंदूला एकदम झिणझिण्या येतात. त्याला प्रश्न पडतो की, हे सगळे त्या काळातही घडत होते? चलाख, वाईट, भोळे-भाबडे, चांगले लोक आजच्यासारखेच तेव्हाही होते? तेव्हाही पैसा-अडका, सोने-नाणे, जमीन आणि स्त्रिया युद्धाचे कारण ठरत? आज जमिनीच्या किमती किती वाढल्यात हे सर्वांनाच माहीत आहे. गावाकडून शहरात आलेल्या लोकांना आपली नैतिक मूल्ये नाइलाजाने गुंडाळून ठेवत महागडे फ्लॅट किंवा जमीन विकत घ्यावी लागते. तसे केले नाही तर त्यांना आयुष्यभर भाड्याच्या घरात राहावे लागेल.
अलीकडे मी हिजाब इम्तियाज अली यांची ‘सब्ज आंखें’ ही अत्यंत सुरस कथा वाचली. या लेखिकेला विमान उडवण्याचा फारच छंद होता. त्यात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले होते. विमान उडवण्याचा परवाना मिळवणा-या त्या पहिल्या भारतीय महिला पायलट होत्या. हिरव्या डोळ्यांच्या एका कापडी मांजराभोवती त्यांची ही कथा फिरते. कथेतील म्हातारे आणि एकटे काका लेखी मृत्युपत्र तयार करण्याआधीच हृदयविकाराच्या सापळ्यात अडकतात. नाइलाजाने ते आपले डॉक्टर, जवळचे काही मित्र आणि पुतणीसमोर तोंडी मृत्युपत्र सांगतात की, माझी सर्व संपत्ती आणि हा महाल माझ्या पुतणीचा आहे आणि ते मखमली मांजर माझ्या बहिणीला द्यावे.
बहिणीला वाटते, वाटणीची ही कुठली पद्धत? ती जोरदार हरकत घेते आणि म्हणते की, माझा भाऊ असे कधीच करणार नाही, यात तुमची काहीतरी चलाखी आहे. शेवटी त्रस्त होऊन काकांची पुतणी सर्व संपत्ती आत्याला देऊन टाकते आणि ते मांजर घेऊन घरी येते. अनेक वर्षांनंतर काकांचे एक मित्र आणि पुतणी अभ्यासिकेत चहा पीत असताना त्यांना त्या मांजराची आठवण येते. मांजर दाखव, असे ते पुतणीला म्हणतात. ती कपाटातून मांजर काढते. त्याचे मखमलीचे पोट शिवते आणि एका टेबलवर ठेवते. तेथे खिडकीतून सूर्याची किरणे आत आलेली असतात. त्यांना अचानक दिसते की, त्या मांजराचे डोळे सप्तरंगात चमकत आहेत. ते एकदम ओरडले, हे डोळे वेगळेच आहेत. रत्नपारख्याने तपासले तेव्हा कळले की, त्या काचेच्या गोट्या म्हणजे कोट्यवधी रुपयांचे हिरे आहेत. लालसा आणि नशिबाच्या भांडणात त्या दिवशी लालसा जिंकली होती. मात्र आज नशिबाने अशी गुढी उभारली की लाखोंच्या संपत्तीवर या कोट्यवधींच्या हि-यांनी मात केली.
असेच काहीसे घडताना मीही पाहिले होते. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दुस-याच्या घरावर कब्जा करू पाहणारा एक जण कोर्टात मोठ्या आवेशाने येत असे. मात्र खरी कागदपत्रे एक दिवस तुरुंगात घेऊन जातील याची त्याला कल्पनाच नव्हती. हे सगळे वाचून-पाहून वाटते की, माणूस आपल्या चुकांतून काही शिकत नाही आणि कथांमधूनही काही बोध घेत नाही. सुमारे 75 वर्षांपूर्वीची ही कथा त्या काळातील उत्कृष्ट कथांपैकी एक होती.
नासिरा शर्मा, साहित्यिक, 6 कादंब-या, 10 कथासंग्रह प्रकाशित