Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | narrowly-girls-marriage-to-dogs

जगावेगळी परंपरा... येथे कुत्र्याशी लावले जाते मुलीचे लग्न

dharm desk, ujjain | Update - Jun 06, 2011, 04:07 PM IST

...अशा रुढींना परंपरा म्हणावे की अंधरूढी असा प्रश्न पडतो.

  • narrowly-girls-marriage-to-dogs

    आपल्या संस्कृतीत लग्नाला सात जन्माचे बंधन मानले गेले आहे. लग्नामुळे केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब जोडले जातात. आपल्या विशाल देशाच्या विविध भागात लग्नाविषयी काही अनोख्या परंपरा पहायला मिळतात. कधी कधी या परंपरा इतक्या विचित्र असतात की त्यावर विश्वासही बसत नाही. अशा रुढींना परंपरा म्हणावे की अंधरूढी असा प्रश्न पडतो. झारखंडच्या ग्रामीण भागात अशीच एक विचित्र परंपरा आहे. या परंपरेनुसार लहान मुलीचे लग्न माणसाशी नाही तर कुत्र्याशी केले जाते.
    या प्रकारचे लग्न तरुणींचे नाही तर लहान मुलींचे करतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सरू आहे. मुलींना दात येताना वरच्या हिरड्यातून आले तर ते अशुभ मानले जाते. हा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी त्या मुलीचे लग्न कुत्र्याशी लावून तोटका केला जातो.

Trending