जाणून घ्या... शिवपिंडीला / जाणून घ्या... शिवपिंडीला जलाभिषेक का करतात ?

Aug 10,2011 03:51:52 PM IST

शिव शंकर हे आदि आणि अनंत आहेत. त्यांची पूजा केल्याने तीन्ही लोकाचे सुख प्राप्त होते. भगवान शंकराने जगाच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले त्यात अनेक संदेश लपलेले आहेत. शिव शंकराची पूजा करुन त्यांना प्रसन्न करण्यासाठी ज्या ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्यातही अनेक संदेश लपलेले आहेत. भगवान शंकराच्या जलाभिषेकाचेही अनन्यसाधारण महत्व आहे. अशी धारणा आहे की, जलाभिषेकामुळे शिव शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करतात.
धर्म शास्त्रातील एक पौराणिक कथा आहे की, समुद्रमंथनानंतर हलाहल अर्थात विष निघाले त्यामुळे तिन्ही लोकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. सर्व देवी-देवतांनी भगवान शंकराला ते विष प्राशन करण्याची विनंती केली आणि भगवान शंकरांनी त्याविनंतीचा मान राखत ते हलाहल पचविले. त्या विषाच्या गर्मीमुळे भगवान शंकर अत्यंत व्याकूळ झाले. त्यामुळेच शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात येतो. हे जल अर्पित करतांना जन्म-मृत्यू पासून मुक्तीची भावना ठेवायला हवी.X