Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | parampara-why-offer-oil-to-hanuman

शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमानाला तेल का अर्पण करतात?

धर्मडेस्क | Update - Jul 20, 2011, 04:31 PM IST

पुराणात शनी आणि हनुमानाशी निगडीत एक कथा आहे.

  • parampara-why-offer-oil-to-hanuman

    हनुमानाला संकटमोचन म्हणले जाते. असे म्हणतात, हनुमान सर्व भक्तांच्या संकटांचे तारण करतो. बहुतांशी ज्योतिषी शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांचा कोप कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा करतात. पुराणात शनी आणि हनुमानाशी निगडीत एक कथा आहे.
    कथेनुसार, शनीचा स्वभाव क्रूर आहे. आपल्या स्वभावानुसार, हनुमानाला त्रास देण्यास सुरू करतो. खूप समजवल्यानंतर हनुमानाने त्याला अद्दल घडवली. हनुमानाच्या मारामुळे पीडित शनी हनुमानाकडे क्षमायाचना करतो. दयाशील हनुमानाने शनीला जखमेवर लावण्यासाठी तेल दिले. त्यावेळी शनी महराजांनी वचन दिले की, हनुमानाचे पुजन जो भक्त करेल आणि हनुमानाला तेल अर्पण करेल त्याच्यावर शनीदेव प्रसन्न राहतील. म्हणूनच साडेसाती किंवा तसेच काही अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळण्यासाठी हनुमानाला तेल अर्पण करतात.

Trending